शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटी विभागाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्र्यांनी दिलेली डेडलाईन हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 20:06 IST

एक दिवसही वर होता कामा नये, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी कंत्राटदाराला दिली होती.

औरंगाबाद : घाटीतील सुपर स्पेशालिटी विभागाच्या कामांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण झाले पाहिजे. एक दिवसही वर होता कामा नये, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी कंत्राटदाराला दिली होती. परंतु चौबे यांनी दिलेली डेडलाईन हुकली असून, या विभागाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

घाटी रुग्णालयात अश्विनीकुमार चौबे यांनी २२ जुलै रोजी आढावा बैठक घेऊन सुपर स्पेशालिटी विभागाच्या कामाची पाहणी केली होती. केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या २२० खाटांच्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागाच्या इमारतीचे कामकाज डिसेंबर-२०१७ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु केवळ ७५ टक्के काम पूर्ण झाल्याने चौबे यांनी कंत्राटदाराला कामाला विलंब होण्याची कारणे विचारली. तेव्हा काम सुरू करण्यासाठी विद्युत वाहिन्यांसह अन्य अडचणींमुळे कामाला उशीर झाल्याचे सांगण्यात आले. चौबे यांनी कामगारांची संख्या विचारल्यावर ३१५ इतकी सांगण्यात आली. मी पाहण्यासाठी येणार असल्याने इतकी संख्या केली का, असा प्रश्नही चौबे यांनी उपस्थित केला होता.

काहीही असो दोन महिन्यांत या विभागाचे काम पूर्ण करा, एक दिवसही वर होता कामा नये, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी ताकीद चौबे यांनी दिली होती. केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशानंतरही अद्याप काम सुरूच आहे. त्यामुळे डिसेंबर-२०१७ ही केंद्रीय मंत्र्यांनी दिलेली डेडलाईनदेखील हुकली आहे. याठिकाणी आवश्यक ती यंत्रे दाखल होत आहेत.एमआरआय, कॅथलॅब, निर्जंतुकीकरण विभाग, आॅपरेशन थिएटरचे काम प्रगतिपथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. परंतु संपूर्ण काम पूर्ण होण्यास महिनाभर लागण्याची परिस्थिती आहे. या कामाला गती देण्याचा प्रयत्न घाटी प्रशासनाकडून सुरू आहे. 

आॅक्टोबरमध्ये काम पूर्णसुपर स्पेशालिटी विभागाचे काम आॅक्टोबरमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद