लोहा : तालुक्यातील जि़प़च्या एकूण २०३ शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व मुली व अनु़ जाती, अनु़जमाती व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ त्यासाठी जवळपास ६१ लाख ७९ हजार ७८ रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी दिली़शाळा सुरू होण्यास अवघ्या तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असून शासनाच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या पूर्ततेकरिताचा सोपस्कार पूर्ण होत असून प्रवेश पंधरवडा, पाठ्यपुस्तके वाटप, गणवेश वाटप आदींसह इतर योजना कार्यान्वित करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत़लोहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण २०३ शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील सर्वच एकूण १२ हजार २६२ मुलींना गणवेश वाटप तसेच अनुसूचित जाती घटकातील २१४०, अनु़जमातीच्या २४९ विद्यार्थ्यांना व दारिद्र्य रेषेतील कुटुंबातील ८७९ पाल्यांना गणवेश वाटप करण्यात येणार आहे़ त्यासाठी नांदेड शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानच्या वतीने तालुक्यातील एकूण १५ हजार ५३० विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ६१ लाख ७९ हजार ७८ रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे़ तालुका शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत तालुक्यात २०३ शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर सदरील रक्कम वर्ग करण्यात येणार आहे़ एकूण १५ हजार ५३० विद्यार्थ्यांना पहिल्या आठवड्याअखेर गणवेश उपलब्ध होणार आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी दिली़ यावेळी दत्ता शिंदे, दिनेश तेलंग, बी़जी़ कराळ, एच़एस़ कवडे, जी़बी़ चिवडे, गजबे उपस्थित होते़ (वार्ताहर)अपघातात १ जखमीमालेगाव : इंडिका कार व टँकरची समोरासमोर टक्कर होऊन १ जण जखमी झाल्याची घटना १४ रोजी सकाळी घडली. रफी अहमद शमीमोद्दीन असे जखमीचे नाव आहे. यात सुदैवाने कारमधील प्रवासी बचावले. (वार्ताहर) गणवेशासाठी ६१ लाख ७९ हजार ७८ रुपयांच्या निधीची तरतूद२०३ शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर रक्कम वर्ग
१५ हजारांवर विद्यार्थ्यांना गणवेश
By admin | Updated: June 15, 2014 00:35 IST