शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

बेपत्ता मुलास घेऊन पथक हिंगोलीत दाखल

By admin | Updated: June 20, 2014 00:08 IST

ेहिंगोली : काकाकडेशिक्षणासाठी राहत असलेला १५ वर्षीय शाळकरी मुलगा अचानक गायब झाल्याची घटना १७ जून रोजी घडल्यानंतर मोबाईल लोकेशनवरून पोलिसांचे पथक शिर्डीला पोहोचले.

ेहिंगोली : काकाकडेशिक्षणासाठी राहत असलेला १५ वर्षीय शाळकरी मुलगा अचानक गायब झाल्याची घटना १७ जून रोजी घडल्यानंतर मोबाईल लोकेशनवरून पोलिसांचे पथक शिर्डीला पोहोचले. मात्र सदरील मुलगा तेथून नेवासा (जि.अहमदनगर) येथे आढळून आला असून त्याला घेऊन पोलिस गुरूवारी रात्री ८.३० वाजता हिंगोलीत पोहोचले.शहरातील डॉ.संजय घुगे यांचा पुतण्या ऋषिकेश उध्दवराव घुगे (१५ रा. टाकळखोपा ता.जिंतूर)) हा हिंगोलीतील भारतीय विद्या मंदीर शाळेमध्ये यंदा दहावीच्या वर्गात शिकत आहे. शिक्षणासाठी तो काकाकडेच राहतो. सोमवारी रात्री तो नेहमीप्रमाणे काकांच्या दवाखान्यात झोपण्यासाठी गेला होता. मात्र मंगळवारी सकाळी तो त्याठिकाणी नव्हता. तसेच दवाखान्यामधील औषधी-गोळ्यांच्या बाटल्या, डब्बे अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. चोरीच्या संशयामुळे डॉ.घुगे यांनी पोलिसांसह श्वानपथकास पाचारण केले. श्वानाने कॉलनीतील दत्त मंदिराजवळील एका घरापर्यंत माग काढला. त्यानंतर पोलिसांनी सदरील बेपत्ता मुलाचा शोध सुरू केला. मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास देशमुख नावाच्या मित्रास मोबाईलवर कॉल करून ‘मी नागपूरला आहे. कुणाला सांगू नकोस’असे ऋषिकेशने सांगितले होते. हा कॉल त्याने शिर्डीतून एका क्वॉईन बॉक्सवरून केल्याचे तपासात स्पष्ट झाले. मोबाईल लोकेशन शोधून सदरील मुलास आणण्यासाठी जमादार मगन पवार, पोना शेख वसियोद्दीन यांचे पथक डॉ.संजय घुगे यांना सोबत घेऊन मंगळवारी रात्री शिर्डीला पोहोचले. परंतू तो शिर्डीत सापडला नाही.दरम्यान, बुधवारी दिवसभराच्या शोधानंतर शनीशिंगणापूर येथे मुक्काम करून पथक पुन्हा गुरूवारी कामाला लागले. तब्बल १८ तासानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे ऋषिकेश घुगे याला शोधण्यात यश आले. त्याला घेऊन पोलिस पथक गुरूवारी संध्याकाळी हिंगोलीत पोहोचले. हा मुलगा नेमका कशामुळे अचानक निघून गेला होता? त्याच्यासोबत कोणी होते का? याची विचारपूस रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होती. (प्रतिनिधी)