हिंगोली : शहरातील रामलिला मैदानाजवळ असलेल्या इंदिरा खुले नाट्यगृहाजवळ ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अंदाजे ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलीस कर्मचारी चाटसे यांनी दिलेल्या माहितीवरुन शहर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. इंदिरा चौकाजवळील खुल्या नाट्यगृहाच्या परिसरात सदरील मृतदेह पडलेला आढळून आला. याबाबत माहिती मिळताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी वाढली. त्यातील एकाने शहर पोलिस ठाण्यास ही माहिती दिली. तातडीने शहर ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मयताची ओळख पटविण्यात पोलिसांना गुरूवारी रात्री उशिरापर्यंत यश आले नव्हते. अधिक तपास पोनि टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पोना चाटसे, एस. के.पाईकराव करीत आहेत. (प्रतिनिधी)
हिंगोलीत खुल्या नाट्यगृहाजवळ अनोळखी मृतदेह
By admin | Updated: September 12, 2014 00:04 IST