शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या भूमिगतचा ‘कारभार’ भूमिगतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:19 IST

महापालिका हद्दीमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या ४६४ कोटी रुपयांतून राबविण्यात येत असलेल्या भूमिगत गटार योजनेचे काम कोणत्या वॉर्डामध्ये कसे चालले आहे. याची वॉर्ड अभियंत्यांना काहीही माहिती नसल्याचे बुधवारच्या स्थायी समितीमध्ये समोर आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिका हद्दीमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या ४६४ कोटी रुपयांतून राबविण्यात येत असलेल्या भूमिगत गटार योजनेचे काम कोणत्या वॉर्डामध्ये कसे चालले आहे. याची वॉर्ड अभियंत्यांना काहीही माहिती नसल्याचे बुधवारच्या स्थायी समितीमध्ये समोर आले. भूमिगत गटार योजनेचा हा भूमिगत कारभार सदस्यांनी चव्हाट्यावर आणून प्रकल्पप्रमुख अभियंता अफसर सिद्दीकी यांची सदस्यांनी प्रचंड कोंडी केली. सभापती गजानन बारवाल यांनी योजनेच्या कामाची माहिती सभागृहाला देण्याचे आदेशदिले.योजनेचे काम ११५ पैकी किती वॉर्डांत सुरू आहे. किती वॉर्ड अभियंत्यांना त्या कामाची गुणवत्ता व दक्षता पाहण्याची जबाबदारी दिली आहे, याची माहिती भाजप सदस्यांनी विचारली. तत्कालीन आयुक्तांनी वॉर्ड अभियंत्यांना गुण व दक्षतासाठी आदेशित केले होते. परंतु त्यानुसार एकाही अभियंत्याने आपापल्या हद्दीतील योजनेचे काम डीपीआरप्रमाणे होत आहे की नाही, याची शहानिशा केलेली नाही. योजनेचे काम संपत आले आहे. जर डीपीआरनुसार वॉर्डांमध्ये योजनेचे काम झालेले नसेल तर भविष्यात कुणाला जबाबदार धरायचे, असा प्रश्न शिवसेना सदस्यांनी पुढे आणला.वॉर्ड अभियंता बी. ए. फड म्हणाले, योजनेचे कोणतेही काम आम्ही साईटवर जाऊन पाहिलेले नाही. तसेच अभियंता नितीन गायकवाड यांनी तशीच माहिती सभागृहात दिली.प्रकल्पप्रमुख सिद्दीकी म्हणाले, आयुक्तांचे आदेश आहेत की, प्रत्येक वॉर्ड अभियंत्यांनी सुपरव्हीजन करावे. यावर शिवसेना सदस्य राजू वैद्य म्हणाले, वॉर्ड अभियंत्यांना या प्रकरणात गोवण्याची गरज नाही. पीएमसी आणि प्रकल्पप्रमुख म्हणून या योजनेचे चांगले किंवा वाईट जे काय होईल, त्याची जबाबदारी तुमची आहे. भाजप सदस्य राजगौरव वानखेडे म्हणाले, जर आयुक्तांनी आदेश दिले असतील आणि वॉर्ड अभियंता जर योजनेच्या कामाची देखरेख करीत नसतील तर सर्वांना निलंबित केले पाहिजे. २०१३ पासून आजपर्यंत तसा कुठलाही आदेश नसल्याचा दावा त्यांनी केला.