शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

वडगाव स्मशानभूमीत अस्वच्छता

By | Updated: December 9, 2020 04:00 IST

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत काटेरी झुडपे वाढली आहेत. लगतच्या नागरी वसाहतींमधील नागरिक स्मशानभूमी परिसरात केरकचरा ...

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत काटेरी झुडपे वाढली आहेत. लगतच्या नागरी वसाहतींमधील नागरिक स्मशानभूमी परिसरात केरकचरा आणून टाकत असल्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. केरकचऱ्यामुळे स्मशानभूमी परिसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. या स्मशानभूमीत साफसफाई अभियान राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

रिक्षाचालकांवर कारवाई करा

वाळूज महानगर : वाळूजला मुख्य रस्त्यावर अ‍ॅपेरिक्षाचालकांनी कब्जा केल्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत असून, रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मुख्य रस्त्यावर अ‍ॅपेरिक्षाचालक रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या करीत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.

वाळूजला एड्‌सविषयी जनजागृती

वाळूज महानगर : वाळूज येथील बजाज ट्रक टर्मिनलमध्ये जागतिक एड्‌स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री सिकंदरअली वज्द मेमोरिअल ट्रस्ट व जिल्हा एड्‌स प्रतिबंध नियंत्रक यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रकचालक व क्लीनरमध्ये एड्‌सविषयी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला माजी सरपंच पपीन माने, संजय पवार, डॉ. विनोद म्हस्के, बाबा पठाण, बळीराम ढेरे, विक्रम ढेरे, मयूर खरात, शेख करीम, गोविंदा बोरुडे आदींची उपस्थिती होती.

उद्योगनगरीत रस्त्याची दुरवस्था

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील कामगार चौक ते एफडीसी चौक या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, ये-जा करणाऱ्या कामगार व उद्योजकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री अंधारात वाहने खड्ड्यात आदळत असल्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासन पुढाकार घेत नसल्यामुळे वाहनधारक, कामगार व उद्योजकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

सिडको महानगरात दुचाकीस्वारांचे स्टंट

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील नागरी वसाहतीत दुचाकीस्वार धूम स्टाइलने दुचाकी पळवून स्टंट करीत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागातील जलकुंभ परिसर, म्हाडा कॉलनी रोड, जलवाहिनी रोड व नागरी वसाहतीत दुचाकीस्वार भराधव वेगाने दुचाकी चालवत असतात. अनेकांनी दुचाकीला कर्णकर्कश हॉर्न बसविले असून, दुचाकीवर ते स्टंट करीत असतात. या परिसरात वाहतूक शाखेचे कार्यालय असूनही धूम स्टाइल वाहने पळविणाऱ्या व स्टंट करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे.

घाणेगाव ग्रामपंचायतीला स्वच्छतेचे वावडे

वाळूज महानगर : घाणेगाव ग्रामपंचायतीला स्वच्छतेचे वावडे असल्यामुळे गावात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी कागदोपत्री स्वच्छता करीत असल्यामुळे नागरी वसाहतीत केरकचरा साचला आहे. हा केरकचरा वाऱ्याबरोबर नागरिकांच्या घरात जात असल्यामुळे वादावादीच्या घटनाही घडत आहेत. ग्रामपंचायतीला स्वच्छतेचे वावडे असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.

बजाजनगरात अतिक्रमणांकडे कानाडोळा

वाळूज महानगर : बजाजनगरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहे. या वाढत्या अतिक्रमणांकडे एमआयडीसी प्रशासन डोळेझाक करीत असल्यामुळे नागरिक व वाहनधारक त्रस्त झाले आहे. या कामगार वसाहतींमधील मोेरे चौक, लोकमान्य चौक, मोहटादेवी चौक, जयभवानी चौक, महाराणा प्रताप चौक आदी ठिकाणी छोट्या व्यवसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत.

रांजणगावात धोकादायक विद्युत तारा

वाळूज महानगर : रांजणगावातील शिक्षक कॉलनी, ओमसाईनगर आदी भागांत महावितरणच्या विद्युत तारा लोंबकळत आहेत. या भागातील अनेकांच्या घरावरून या विद्युत तारा गेल्या असून, या तारांमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. या धोकादायक विद्युत तारा काढून भूमिगत वीजजोडणी देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून महावितरणकडे अनेकदा करण्यात आली आहे.