गेवराई : येथील नगर परिषद सभागृहात सोमवारी दुपारी १२ वाजता विविध विषय समित्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सोमवारी दुपारी १२ वाजता विषय समित्या नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अशिषकुमार बिरादार, मुख्यधिकारी भागवत बिघोत याच्या उपस्थितीत या निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. यात राहुल खंडागळे नियोजन विकास, बांधकाम सभापती, जानमंहमद बागवान पाणीपुरवठा, जलनि:सारण सभापती, भरत गायकवाड वाचनालय व शिक्षण सभापती, सीमा इंगळे महिला व बाल कल्याण सभापती, तर आयशा सिद्दिकी उपसभापती महिला व बाल कल्याण, राजेंद्र राक्षसभुवनकर हे उपनगराध्यक्ष हे पदसिध्द स्वच्छता व आरोग्य समिती याप्रमाणे निवड करण्यात आली. या निवडीनंतर सर्वांचे सत्कार करण्यात आले. फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. या वेळी सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
गेवराईत बिनविरोध निवडी
By admin | Updated: January 23, 2017 23:36 IST