वाळूज महानगर : जोगेश्वरी येथील विनय इंगळे व रांजणगाव शेणपुंजीस्थित सोनाजी देशमुख हे दोन युवक बेपत्ता झाल्याची तक्रार वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. विनय इंगळे (१८) हा युवक त्याचे नातलग एकनाथ पाचरणे यांच्याकडे शिक्षणासाठी राहतो. तो शहरातील एका नामांकित विद्यालयात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. विनय बुधवारी सकाळी ११ वाजता बाहेर गेला. तो परतलाच नाही. पाचरणे यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय साठे करीत आहेत. सोनाजी देशमुख (२३), रा. रांजणगाव शेणपुंजी हा औद्योगिक क्षेत्रात खाजगी कंपनीत कामाला आहे. तो सोमवारी सकाळी गावाला जातो, असे सांगून गेला, पण तो अद्याप घरी पोहोचला नाही. सोनाजीचा चुलतभाऊ प्रशांत (रा. पारध, ता. भोकरदन, जि. जालना) व त्याच्या नातेवाईकांनी सोनाजीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाईल बंद आहे. प्रशांत देशमुख यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोनाजी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक जी. के. कोंडके करीत आहेत.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातून दोन युवक बेपत्ता
By admin | Updated: December 20, 2015 23:55 IST