शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात दोन तरुण डॉक्टर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:08 IST

परिसरातील हॉटेलवर जेवण करून जालना रोडने औरंगाबादकडे येणा-या डॉक्टरांच्या कारचा रामनगर कमानीजवळ झाडाला धडकून मंगळवारी रात्री अडीच वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला, तर एक डॉक्टर गंभीर जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : परिसरातील हॉटेलवर जेवण करून जालना रोडने औरंगाबादकडे येणा-या डॉक्टरांच्या कारचा रामनगर कमानीजवळ झाडाला धडकून मंगळवारी रात्री अडीच वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला, तर एक डॉक्टर गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.तीन डॉक्टर मित्र कारने (क्रमांक- एमएच २० डी.व्ही. ४९३२) जालना येथे मित्राकडे कार्यक्रमाला गेले होते. जालन्याहून परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रामनगर कमानीजवळ झाडावर धडकली. या अपघातात डॉ. गोविंदकुमार सतनामसिंग (२५, रा. हरियाणा, ह. मु. सिडको), डॉ. लक्ष्मीकांत दगडिया (२५, रा. म्हाडा कॉलनी, रामनगर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर डॉ. अरविंद पवार (२५, रामनगर) हे गंभीर जखमी झाले. पुलाजवळ असलेल्या झाडाला कार १३० च्या स्पीडमध्ये येऊन धडकली. त्यामुळे गाडीची उजवी बाजू पूर्णत: डाव्या बाजूला स्टेअरिंगसह दबली. गंभीर जखमींना मुकुंदवाडी पोलिसांनी क्रेनच्या साह्याने ओढून बाहेर काढले व शासकीय दवाखान्यात दाखल केले. डॉ. गोविंदकुमार सतनामसिंग, डॉ. लक्ष्मण दगडिया या दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.सिंग व दगडिया, पवार या तिघांनीही गेल्याच वर्षी शहरातील महाविद्यालयातून बीएचएमएस ही पदवी प्राप्त करून येथील रुग्णालयातून त्यांनी काम सुरू केले होते.सिंग व दगडिया दोघेही सांगवीकर हॉस्पिटल येथे काम करीत होते, तर अरविंद पवार हे काही दिवस अ‍ॅपेक्स हॉस्पिटल येथे कार्यरत होते. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास फौजदार संजय बनसोड, पोहेकॉ मुंडे, ढवळे करीत आहेत.नुकतेच पासआऊट झालेल्या या तिघांनी फुलंब्री येथे दवाखाना सुरू करण्याची जुळवाजुळव केली होती. स्वत:चे हॉस्पिटल सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात असतानाच त्यांच्यावर नियतीने घाला घातला.१६ मे ला लक्ष्मीकांतचा होता विवाहतिघे वर्गमित्र सांगवीकर दवाखान्याच्या इमारतीचे मालक अंकुश भुसारे यांची कार घेऊन जालना येथे गेले होते. १६ मे ला लक्ष्मीकांत दगडिया यांचा विवाहदेखील ठरला होता. हात पिवळे होण्याअगोदरच काळाने घाला घातल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.