शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

नाराजांच्या वॉर्डांत दोन कामे

By admin | Updated: December 23, 2015 00:05 IST

औरंगाबाद : कामे होत नसल्याबद्दल स्थायी समितीत ओरड झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभारी आयुक्तांनी मंगळवारी स्थायी समिती सदस्यांची तातडीची बैठक घेतली.

औरंगाबाद : कामे होत नसल्याबद्दल स्थायी समितीत ओरड झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभारी आयुक्तांनी मंगळवारी स्थायी समिती सदस्यांची तातडीची बैठक घेतली. सर्व सदस्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक सदस्याचे दोन-दोन कामे करून देण्याचे आश्वासन दिले. सोबतच पालिकेच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून दिली. तसेच तुम्ही वास्तववादी अर्थसंकल्प दिल्याशिवाय मी काहीही करूशकत नाही, अशी हतबलता व्यक्त करीत विकासकामांच्या प्रश्नाचा चेंडू पुन्हा स्थायी समितीच्याच कोर्टात टोलविला. मनपाच्या स्थायी समितीची बैठक सोमवारी सभापती दिलीप थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या गैरहजेरीत झालेली ही बैठक वादळी ठरली. निवडणूक होऊन आठ महिने झाले तरी वॉर्डात एकही काम न झाल्याबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, तर भाजपच्या कमल नरोटे यांनी रस्त्याचे काम होत नसल्याच्या निषेधार्थ राजीनाम्याचा इशारा देत सभात्याग केला. बाहेरगावाहून सकाळीच परतल्यानंतर केंद्रेकर यांनी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध बैठकीचा वृत्तांत पाहिला. प्रशासनाविषयी सदस्यांच्या मनात तीव्र नाराजी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने स्थायी समिती सदस्यांना निरोप पाठविले. दुपारी १२ वाजता सभापती दिलीप थोरात यांच्या उपस्थितीत त्यांनी तब्बल दोन तास सर्व सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीतही मकरंद कुलकर्णी, मोहन मेघावाले, कमल नरोटे, नितीन चित्ते, नाईकवाडी, विकास एडके, समिना शेख अशा सर्वच सदस्यांनी आयुक्तांपुढे तक्रारींचा पाढा वाचला. ८ महिन्यांपासून बैठकीत घसा कोरडा पडेपर्यंत ओरडत आहोत, पण एकही काम होत नाही, मग आम्ही जनतेला तोंड कसे दाखवायचे असा संतप्त सवाल या सदस्यांनी उपस्थित केला. तसेच प्रलंबित कामांची यादीच वाचून दाखविली. वॉर्डातील ड्रेनेज दुरुस्ती, रस्त्यांचे पॅचवर्क यांसारख्या लहान सहान कामांनाही प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे, असा आरोपही यावेळी सदस्यांनी केला. त्यावर आयुक्तांनी आधी पालिकेच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून दिली. तरीही सदस्यांच्या भावना तीव्र होत्या. त्या लक्षात घेऊन शेवटी केंद्रेकर यांनी सर्व सदस्यांची दोन दोन कामे करून देण्याचे आश्वासन दिले. तुम्ही तुमच्या वॉर्डातील महत्त्वाच्या एक एक, दोन दोन कामांच्या याद्या माझ्याकडे द्या, त्या करून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सदस्यांचा विरोध काहीसा मावळला.