शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैठण -पाचोड रस्त्यावर २ दुचाकींची धडक; २ ठार,२ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:32 IST

पैठण -पाचोड रस्त्यावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोलनापूर फाट्याजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले.

पैठण : पैठण -पाचोड रस्त्यावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोलनापूर फाट्याजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी दुपारी चार वाजता घडली. अपघात नेमका कसा झाला, हे जखमींचा जबाब घेतल्यानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.या अपघातात भारत ज्ञानेश्वर नेमाणे (२४) व शुभम रत्नाकर सोनवणे (२१, दोघे रा. पाचोड) हे तरुण मरण पावले, तर आकाश विश्वनाथ मगरे (१९), आकाश आबासाहेब थोरात (२०, रा. सर्व पाचोड) हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले. पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. हे चारही तरूण मोटारसायकलने एका विवाह सोहळ्यासाठी पैठण येथे आले होते. लग्न आटोपून दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून पाचोडकडे जात असताना हा अपघात झाला. घटनास्थळी जखमी अवस्थेत असलेल्या या तरुणांना आपेगाव येथील माऊली मुळे, लक्ष्मण बनकर, सुनील मेहेत्रे, चंद्रकांत झारगड यांनी पैठण रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी संदीप रगडे, शैलेश साळवे यांनी जखमींवर उपचार केले.रुग्णासोबत जाण्यासाठीकुणीही पुढे आले नाहीपैठण रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमींना १०८ रूग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद येथे घेऊन जाण्याचा निर्णय झाला. दरम्यान, रूग्णालयात शेकडो जण उपस्थित असताना रूग्णासोबत जाण्यास कुणीही तयार होत नव्हते. पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पो. कॉ. लालचंद नागलोत, भगवान गायकवाड, किशोर शिंदे यांनी चर्चा करून एकास या गाडीसोबत पाठवले. अपघात झाल्यानंतर कुणी पुढे येत नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे.सहा महिन्यांपूर्वीच झाला होता भारतचा विवाहया अपघातात मरण पावलेल्या भारत नेमाणेचा विवाह सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. पाचोड येथे मोसंबी ज्युस सेंटर भारत चालवत होता. भारतच्या अपघाती मृत्यूने पाचोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.