शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 21:50 IST

ट्रक, कार व दुचाकी अशा तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जखमी

वाळूज महानगर : ट्रक, कार व दुचाकी अशा तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात घडली.

मोरे चौकाकडून रांजणगावच्या दिशेने गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कार (एमएच- २०, डीजे-६७७५) व ट्रक (जीजे-१०, टीएक्स- १६७८) जात होते. जात असताना महाराणा प्रताप चौकात बीकेटी कंपनीकडून बजाजनगरकडे भरधाव जाणारा दुचाकीस्वार अचानक कारच्या समोर अडवा आला.

दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाने कार उजव्या बाजूला दाबली. त्यामुळे कार व ट्रकची धडक झाली. भरधाव दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकी जाऊन ट्रकच्या पाठीमागील बाजूस धडकली. ट्रकचालकाने वेळीच ट्रकचे ब्रेक लावल्याने दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.

अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. यात दुचाकीस्वार जखमी झाला असून, कारचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या अपघाताच्या घटनेमुळे चौकात जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती.

ट्रक चालकास मारहाणट्रकचालक मर्यादित वेगाने व रस्त्याच्या एका बाजूने जात होता. या अपघाताच्या घटनेत काहीही चूकी नसताना ट्रकचालकास दोषी धरुन काही तरुणांनी बेदम मारहाण केली. काही सुज्ञ नागरिकांनी मध्यस्थी करुन ट्रकचालकाची तरुणाच्या टोळक्यातून सुटका केली.

टॅग्स :WalujवाळूजAccidentअपघात