सुभाष रतन ढेपले (रा.पाथ्री, ता.फुलंब्री) व केशवराव महादू जाधव (रा.गेवराई सेमी, ता. सिल्लोड), असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वारांचे नाव आहे.
केशवराव जाधव हे पत्नीसह दुचाकी (क्र. एम. एच. २० ए. एम. ६०६२)ने पत्नीसह फुलंब्रीहून गेवराईकडे जात होते. त्याचवेळी समोरून सुभाष रतन ढेपले व रवींद्र ढेपले हे दुचाकी (क्र. एम. एच. २१ एफ.१९६३)ने येत होते. बोरगाव फाट्यावर दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या. यात सुभाष ढेपले हे जखमी झाले, तर केशवराव जाधव यांच्या पायाचे हाड तुटले. अपघात होताच जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी औरंगाबादला रुग्णालयात दाखल केले. आळंद ते बोरगाव अर्ज फाट्यादरम्यान एका ठिकाणी महामार्गाच्या काँक्रीटचे काम बाकी असल्याने दुचाकीस्वार राँगसाइडने येतात. यामुळे हा अपघात झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.
फोटो ओळ : अपघातग्रस्त दुचाकी.