औरंगाबाद : मनपा नको तर नगर परिषदच हवी अशा आशयाची दोन हजार विनंतीपत्रे (पोस्टकार्ड) मुख्यमंत्री महोदयांच्या पत्त्यावर मुंबई मंत्रालयाच्या दिशेने प्रवासास निघाली आहेत. सातारा-देवळाई नगर परिषद बरखास्तीचे आदेश काढून त्यावर नागरिकांच्या हरकतीही जिल्हा प्रशासनाने मागविल्या. साडेचार हजारांच्या जवळपास हरकतींचा पाऊस पडला आहे. त्यावर सुनावणी काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेशासनाने जिल्हा प्रशासनाला अहवाल मागितला अन् तासाभरात तो मंत्रालयात गेला आहे. १४ महिन्यांपासून सातारा-देवळाईकरांचे हाल सुरू आहेत. म्हणूनच महानगरपालिका नको तर नगर परिषद हवी, विकासाला साथ द्यावी, असे विनंतीपत्रात म्हटले आहे. हरकतींवर सुनावणी होईल, अहवाल मंत्रालयात जाईल अन् पुढील निर्णय होईल. अंतिम मुदतीपर्यंत हरकतींचा ओघ सुरू राहिला. आता स्वत: नागरिक टपाल कार्यालयात पत्र टाकून आपल्या व्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवीत आहेत. त्या प्रतिक्रियाही बोटावर मोजण्याइतपत नसून त्याचा आकडा २ हजार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या कामासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सामाजिक संघटनाही कामाला लागल्या असून, शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांचाही नगर परिषदेला पाठिंबा असून अनेक कार्यकर्ते महानगरपालिकेच्या दृष्टीने कामाला लागले असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविले दोन हजारांवर पोस्टकार्ड
By admin | Updated: November 16, 2015 00:40 IST