औरंगाबाद : केंद्रीय निवडणूक आयोगाने औरंगाबाद जिल्ह्यासाठी मुंबई येथून आणखी दोन हजार ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ईव्हीएमचा तुटवडा दूर झाला आहे. या ईव्हीएम औरंगाबादेत दाखल झाल्या असून त्यांची तपासणी उद्यापासून सुरू केली जाईल.आयोगाने दोन महिन्यांपूर्वी उत्तराखंड राज्यातून ३९०० ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत यावेळी उमेदवारांची भाऊगर्दी झाली. या ठिकाणी उमेदवारांची संख्या १५ च्या पुढे गेल्याने तिथे दोन- दोन ईव्हीएम मशीनचा वापर करावा लागणार आहे. परिणामी, जिल्ह्यात ईव्हीएमचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आयोगाकडे तातडीने दोन हजार ईव्हीएमचा पुरवठा करण्याची मागणी नोंदविली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने मुंबई येथून दोन हजार ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या. त्यांची प्राथमिक तपासणी उद्या मंगळवारपासून केली जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.
मुंबईहून आल्या दोन हजार ईव्हीएम
By admin | Updated: October 7, 2014 00:44 IST