शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दोनच ग्रा.प.मध्ये पायका योजना

By admin | Updated: June 25, 2014 01:28 IST

अशोक कारके , औरंगाबाद केंद्र शासनाच्या पायका क्रीडा योजनेचा जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींनी दोन वर्षांत दीड कोटी रुपये उचलले; परंतु केवळ २ ग्रामपंचायतींनी या निधीचा योग्य वापर केला आहे.

अशोक कारके , औरंगाबादकेंद्र शासनाच्या पायका क्रीडा योजनेचा जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींनी दोन वर्षांत दीड कोटी रुपये उचलले; परंतु केवळ २ ग्रामपंचायतींनी या निधीचा योग्य वापर केला आहे.ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना मिळावी व त्यातून उत्तम खेळाडू तयार व्हावेत यासाठी केंद्रीय पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान (पायका) ही योजना २००८-२००९ पासून राबविण्यात येत आहे. २००८-९ मध्ये ८४, तर २००९- १० मध्ये ७३ ग्रामपंचायतींना पायकांतर्गत मैदान तयार करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये निधी दिला गेला. यापैकी ८४ पैकी फक्त दोनच ग्रामपंचायतींनी काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून योजनेच्या आढावा बैठकीत गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानाचे काम पूर्ण झाले आहे, काम पूर्णत्वाचा दाखला देतो, असे गेल्या अनेक बैठकांमध्ये सांगत आहेत व जिल्हा क्रीडा विभागातील अधिकारी तलाठी व ग्रामसेवकाकडे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करा, अशी मागणी करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.२००८-९ व २००९-१० आर्थिक वर्षात १५७ ग्रामपंचायतींना मैदान तयार करण्यासाठी १ कोटी ५७ लाख रुपये केंद्र व राज्य शासनाने दिले. प्रत्येक ग्रामपंचायतीला दहा हजार रुपयांचे क्रीडा साहित्यही दिले. यासाठी १५ लाख ७० हजार रुपये खर्च झाला.गेल्या पाच वर्षांत १५७ ग्रामपंचायतींपैकी २००८-९ मध्ये सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव व केऱ्हाळा या ग्रामपंचायतींनी मैदानाचे काम पूर्ण केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिली आहे.२००९-१० मध्ये मात्र पैसे मिळालेल्या ७३ पैकी एकही ग्रामपंचायत काम पूर्ण करू शकली नाही.योजनेत केंद्राचा ७५ टक्के व राज्य शासनाचा २५ टक्के वाटा आहे.योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून आॅलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील, असा हेतू आहे. हॉलीबॉल, फुटबॉल, गोळा, थाळीफेक आदी साहित्य ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आले आहे.निधी परत जाणारलवकरच ग्रामपंयायतींनी काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यास मैदान तयार करण्यासाठी दिलेला निधी परत करण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतींना दिले जातील.-चंद्रकांत कांबळे,उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा५० टक्के काम अपूर्णगटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी व ग्रामसेवकांच्या बैठका घेतल्या आहेत. ५० टक्के ग्रामपंचायतींचे काम पूर्ण झाले आहे. जुलैअखेरपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे काम पूर्ण होईल. काही ग्रामपंचायतींचा जागेचा प्रश्न होता. तो सुटला आहे.-ऊर्मिला मोराळे,जिल्हा क्रीडा अधिकारीग्रामपंचायतीजिल्ह्यातील एकूणग्रामपंचायती- ८५९२००८-२००९ व २००९-२०१० या वर्षी पायकाचा लाभ मिळालेल्या ग्रामपंचायती- १५७गेल्या पाच वर्षांत काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर केलेल्या ग्रामपंचायती- २