शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत बनावट आधार कार्ड बनवून देणारे दोन जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 13:49 IST

आधार कार्डच्या स्कॅनिंगमुळे हा प्रकार उघडकीस आला.  

ठळक मुद्देतरुणाच्या सतर्कतेने आले उघडकीस शासकीय योजनांचे मानधन सुरू करण्याचे आमिष

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : आधार कार्डसह शासनाच्या विविध रोजगार योजनांचे मानधन सुरू करून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या महिलेसह दोघांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. आधार कार्डच्या स्कॅनिंगमुळे हा प्रकार उघडकीस आला.  

छाया उगले (३२) व सुनील दादाराव उगले (४०, रा. क्रांतीनगर गल्ली नं. ३, औरंगाबाद) हे दोघे मिळून एक ते दीड महिन्यापासून बजाजनगर, म्हाडा कॉलनी, तीसगाव, गोलवाडी, सिडको आदी परिसरात आधार कार्ड, बसचे अर्धे तिकीट काढून देतो. तसेच अपंग, मूकबधिर, रोहयोसह इतर कामगार योजनांचे मानधन सुरू करून देण्याचे आमिष दाखवत पैसे जमा केले. आधार कार्ड व बसचे अर्ध्या तिकिटाच्या नावाखाली प्रत्येकी ३०० रुपये, तर योजनांचे मानधनासाठी प्रत्येकी १ हजार रुपये जमा केले. 

सुनील उगले हा छाया हिला गावात सोडून परत घ्यायला यायचा. छाया दुपारच्या वेळी महिलांना गाठून त्यांना शासनाच्या योजनांची माहिती पटवून द्यायची व अनेकांना मानधन सुरू करून दिल्याचे सांगायची. ते ग्रामस्थांकडून फॉर्मही भरून घेत. यात तीसगावातील ५० पेक्षा अधिक नागरिक आहेत. पोलिसांनी छाया उगलेसह सुनीलला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  

अशी झाली बनवेगिरी उघडछाया उगले हिने तीसगावातील काही नागरिकांना नवीन आधार कार्ड काढून दिले.  जगदीश शेलारे यांनी हे आधार कार्ड आधारच्या अ‍ॅपवर स्कॅन करून पाहिले असता त्यावर नाव दुसऱ्याचे तर पत्ता नाशिकचा आला. शेलार यांनी असे पाच ते सहा आधार कार्ड स्कॅन करून पाहिले असता सर्वच आधार कार्डवर नाव आणि पत्ता सारखाच दिसून आला. सोमवारी दुपारी छाया उगले पैसे जमा करण्यासाठी तीसगाव येथे आली असता तिला बनावट आधार कार्ड विषयी विचारणा केली. यावर तिला काहीच सांगता आले नाही. त्यानंतर छाया हिने सुनील उगले याला बोलावून घेतले. नागरिकांनी दोघांनाही पकडून वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीAdhar Cardआधार कार्डArrestअटक