शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अहिंसानगरमधील हायफाय कुंटणखान्यावर गुन्हेशाखेची धाड, दोन जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 17:24 IST

आकाशवाणी समोरील अहिंसानगरमध्ये सुरू असलेल्या उच्चभ्रू कुटंणखान्यावर गुन्हेशाखा पोलिसांनी मंगळवारी (दि.२४)रात्री छापा मारला. या छाप्यात दलालासह आंटीला अटक करून तेथे वेश्या व्यवसायासाठी मुंबईहून आणण्यात आलेल्या दोन तरूणींची मुक्तता केली.

ठळक मुद्देअहिंसानगरातील  एका बंगल्यात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती खब-याने पोलिसांना दिली.मुंबईहून आणण्यात आलेल्या दोन तरूणींची मुक्तता करण्यात आली

औरंगाबाद : आकाशवाणी समोरील अहिंसानगरमध्ये सुरू असलेल्या उच्चभ्रू कुटंणखान्यावर गुन्हेशाखा पोलिसांनी मंगळवारी (दि.२४)रात्री छापा मारला. या छाप्यात दलालासह आंटीला अटक करून तेथे वेश्या व्यवसायासाठी मुंबईहून आणण्यात आलेल्या दोन तरूणींची मुक्तता केली. या कारवाईने अहिंसानगरात खळबळ उडाली.

प्रवीण बालाजी कुरकुटे (३५,रा. ज्योती प्राईड, सातारा परिसर) आणि  आंटी यांचा आरोपीत समावेश आहे. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हेशाखा पोलिसांनी सांगितले की, अहिंसानगरातील  एका बंगल्यात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती खब-याने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे आणि सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी,साईनाथ महाडिक, पोहेकाँ संतोष सोनवणे, फारूख देशमुख,  विद्यानंद गवळी, शिवाजी भोसले,संजय जाधव, सिद्धाार्थ थोरात,ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे, लालखाँ पठाण,योगेश गुप्ता, महिला कर्मचारी संजीवनी शिंदे चालक म्हस्के आणि कांबळे यांनी बनावट ग्राहक सदर बंगल्यात पाठविला. त्यावेळी आरोपी प्रवीण आणि आंटी त्यांना भेटले. यावेळी पोलिसांच्या बनावट ग्राहकांने त्यांच्याकडे वेश्यागमन करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आरोपींनी दोन मुली त्याच्यासमोर उभ्या केल्या आणि एक हजार रुपये प्रती मुलगी असा दर सांगितला. 

यानंतर पोलिसांना मिळालेली माहितीची खात्री पटताच खब-याने पोलिसांना फोन करून इशारा केला. यावर बंगल्याच्या परिसरात थांबलेल्या पोलिसांनी तेथे धाड मारली. यावेळी पोलिसांनी पंचासमक्ष बनावट ग्राहकांकडून आरोपींनी घेतलेली रक्कम जप्त, आरोपींचे मोबाईल जप्त केली. वेश्या व्यवसाय करून घेण्यासाठी तेथे मुंबईहून आणलेल्या दोन मुलींची मुक्तता केली. आरोपी प्रवीणला आणि आंटीला अटक केली. 

मुंबईहून आणल्या दोन मुलीआरोपी प्रवीण आणि आंटी दोघेही अनेक दिवसापासून या व्यवसायात असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले. आंटीला पोलिसांनी यापूर्वी पकडले होते. तर प्रवीण हा प्रथमच पोलिसांच्या हाती लागला. त्यानेच मुंबईतील मालाड येथून मुली आणल्या होत्या. विशेष म्हणजे त्याने दोन्ही मुलींना उसने पैसे दिले होते. ही रक्कम फेडण्यासाठी त्यांनी त्यांना औरंगाबादेत बोलावून घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.