नळदुर्ग : येथील बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील २ लाख १० हजार रूपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना ३१ आॅगस्ट रोजी दुपारी नळदुर्ग बसस्थानकात घडली असून, या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहरातील व्यासनगर भागातील रहिवाशी असलेल्या स्वाती धनंजय सूर्यवंशी या ३१ आॅगस्ट रोजी सकाळी नळदुर्ग येथील बसस्थानकात तुळजापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या़ त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्याकडील प्लॅस्टिक बॅगेतील दागिने व रोख १० हजार असा २ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत स्वाती सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, सदरील घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सय्यद हे करीत आहेत़ दरम्यान, बसस्थानकातून २ लाखाचा मुद्देमाल लंपास झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)
महिलेच्या पर्समधील २ लाखांचे दागिने लंपास
By admin | Updated: September 3, 2016 00:27 IST