शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांमध्ये दोन ठार

By admin | Updated: January 29, 2017 23:58 IST

बीड/गेवराई : तालुक्यातील नवगण राजुरीजवळ अज्ञात ट्रकने टेम्पोला धडक दिली. यात चालक जागीच ठार झाला, तर गेवराई तालुक्यातील खांडवी फाटा येथे भरधाव कार विद्युत खांबावर धडकून एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला.

बीड/गेवराई : तालुक्यातील नवगण राजुरीजवळ अज्ञात ट्रकने टेम्पोला धडक दिली. यात चालक जागीच ठार झाला, तर गेवराई तालुक्यातील खांडवी फाटा येथे भरधाव कार विद्युत खांबावर धडकून एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री या दोन्ही घटना घडल्या.राजुरीजवळ अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव सीताराम आसाराम ढोले (३८, रा. बार्शी नाका, बीड) असे आहे. ते टेम्पो (क्र. एमएच-०२ टी-६३५८) मध्ये नगरला भाडे घेऊन गेले होते. तेथे माल उतरवून रात्री बीडकडे येत होते. नवगण राजुरी शिवारातील गजानन कारखान्यासमोर थुंकण्यासाठी त्यांनी डोके व हात बाहेर काढले. यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव अज्ञात ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.ग्रामीण ठाण्याचे पोहेकॉ. शांताराम रोकडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू होती.दुसऱ्या घटनेत परळी येथील गुळाचे व्यापारी राजगोपाल रामनारायण लड्डा (५० रा. ओपळे गल्ली, परळी) हे कार (क्र. एमएच ४४ के - ४१११) मधून रविवारी परळीहून नंदूरबारकडे जात होते. खांडवी फाट्यावर चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलालगत असलेल्या विद्युत खांबावर आदळली. यात लड्डा यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक किरकोळ जखमी आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री उशिरापर्यंत गेवराई ठाण्यामध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली नव्हती. (प्रतिनिधी)