शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित बेरोजगारांना फसविणाऱ्या टोळीतील दोन गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:32 IST

औरंगाबाद : विमान प्राधिकरणात नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोगारांना फसविणाऱ्या टोळीतील दोघांना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली.

औरंगाबाद : विमान प्राधिकरणात नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोगारांना फसविणाऱ्या टोळीतील दोघांना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली.तौफिक हानीफ पटेल (रा. ऐरोली, नवी मुंबई), सचिन ऊर्फ अजय सिंह (३३, रा. वसई), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रामदास तातेराव खवळे (२८, रा. औराळा, ता. कन्नड) यांच्या बहिणीची दोन मुले असून, त्यांच्यासाठी वृत्तपत्रात आलेल्या विमान प्राधिकरणाविषयीच्या जाहिरातीवरून अर्ज दाखल केला होता. आरोपींनी त्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क करून निवड झाल्याची थाप मारली. बँक खात्यात २ हजार रुपये टाकण्यास सांगितले. पुन्हा ७,५०० रुपये पाठवा, त्यातून शूज व कपड्याचा खर्च काढला जाणार आहे. काही दिवसांत तुम्हाला ड्यूटीवर बोलाविले जाईल, अशी कागदपत्रे व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविण्यात आली. खूप दिवस झाल्यानंतरही काही खुलासा न झाल्याने अखेर खवले यांनी वैजापूर येथे आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.प्रकरण सायबर सेलकडे वर्गसायबर सेलचे पोलीस निरीक्षक अशोक घुले यांनी सखोल चौकशी करून वेगवेगळे ५ ते ६ खाते शोधले की, त्यावरून व्यवहार झाले आहेत. त्याचा आधार घेऊन बीड येथील व्यक्तीने तौफिक हानीफ पटेल यास ओळखले. खबºयाकडून मिळालेल्या माहितीवरून ऐरोली येथून त्याला ताब्यात घेतले. त्याचे एसएस इंटरप्राईजेस प्रॉपर्टी सोल्युशन दुकान आनंदनगर वसई भागात आहे. माणिकनगर वसई पोलिसांच्या मदतीने सचिन कैलासनाथ सिंह (३३) यास ताब्यात घेतले.बेरोजगारांची फसवणूकजाहिराती पाहून बेरोजगारांनी दाखल केलेल्या अर्जावरून त्यांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे लुबाडण्याचे काम सचिन ऊर्फ अजयसिंग व त्याच्या पत्नीने केले आहे. या दाम्पत्याने ५०० ते ६०० बेरोजगारांना फसविल्याची माहिती समोर येत आहे. प्रॉपर्टी डिलिंग व इतर व्यवसायांत त्याने वेगवेगळ्या खात्यांतून कोटींच्या वर व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडील ६ एटीएम कार्ड, मोबाईल सीमकार्ड, लॅपटॉप व इतर साहित्य सायबर टीमने जप्त केले आहे. या टोळीने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा इत्यादी राज्यांतही फसवणूक केली आहे.आरोपींना मुंबईहून आणण्याची कारवाई निरीक्षक अशोक घुले, पोलीस उपनिरीक्षक मोहसीन सय्यद, पोलीस नाईक कैलास कामठे, रवींद्र लोखंडे, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, जीवन घोलप, गजानन बनसोड आदींच्या टीमने केली आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक