शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

दोन माजी अध्यक्षांनी दिल्या कर्मचाऱ्यांना धमक्या

By admin | Updated: May 9, 2015 00:55 IST

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ अद्याप खुर्चीतही टेकले नाही तर शुक्रवारी पहिल्याच दिवशी दोन माजी अध्यक्षांनी बँकेत जाऊन एका वकिलास

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ अद्याप खुर्चीतही टेकले नाही तर शुक्रवारी पहिल्याच दिवशी दोन माजी अध्यक्षांनी बँकेत जाऊन एका वकिलास व कर्मचाऱ्यास पूर्वी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून धमक्या दिल्याचा प्रकार घडला. हे दोन्ही माजी अध्यक्ष नवनिर्वाचित संचालकांचे वडील आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर असताना राजाभाऊ मुंडे व सुभाष सारडा यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे अफरातफर करीत कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अपहार प्रकरणी राजाभाऊ मुंडेंनी ‘हर्सूल’वारीही केली आहे.दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळासाठीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना संचालक मंडळाच्या निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या माजी संचालक मंडळाच्या सदस्यांनी त्यांची मुले व नातेवाईकांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. सदरील निवडणुकीत काही घोटाळेबाज माजी संचालकांचे नातेवाईक व मुले निवडून आली आहेत.पहिल्या दिवशीच उलट परिणामनवनिर्वाचित संचालक फुलचंद मुंडे यांचे वडील राजाभाऊ मुंडे आणि आदित्य सारडा यांचे वडील सुभाष सारडा हे शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बँकेत दाखल झाले. त्या दोघांनी प्रथम बँकेची बॅलेन्सशीट व इतर कागदपत्रे तपासली. त्यानंतर बँकेचा कारभार पाहणाऱ्या वकिलासोबत हुज्जत घालण्यास त्यांनी सुरूवात केली. तसेच बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना धमकावले. जवळपास दोन तास ते बँकेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.डीसीसी बँकेचे आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी व बँक पूर्ववत आणण्यासाठी प्रयत्न करणे हे संचालक मंडळापुढचे मोठे आव्हान आहे. त्यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. मात्र, पहिल्याच दिवशी माजी संचालकांनी गोंधळ घातला. हा प्रकार हितवाह नसल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे. प्रतिक्रियासाठी संपर्क साधला असता, राजाभाऊ मुंडे व सुभाष सारडा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उपनिबंधक कार्यालय लातूर यांना नवनिर्वाचित संचालकांची यादी पाठविली आहे. १५ मे रोजी डीसीसी अध्यक्ष पदाची निवड होणार असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी व्ही. एस. जगदाळे यांनी सांगितले. सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याच्या नोटिसा पाठविल्या असल्याचे ते म्हणाले. भाजप जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, आडसचे सरपंच ऋषीकेश आडसकर यांची नावे चर्चेत आहेत.