शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
6
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
7
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
8
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
9
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
10
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
11
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
12
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
13
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
14
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
15
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
16
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
18
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
19
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
20
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल

सिल्लोड तालुक्यातील जिनिंगचे दोन कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 00:21 IST

सिल्लोड तालुक्यातील काही खाजगी जिनिंग मालक विना परवाना कापूस खरेदी करत आहेत, तर काही जिनिंग चालक शासनाचा कर थकवीत आहेत.

सिल्लोड तालुक्यातील काही खाजगी जिनिंग मालक विना परवाना कापूस खरेदी करत आहेत, तर काही जिनिंग चालक शासनाचा कर थकवीत आहेत. राजकीय वरदहस्त व प्रशासनाची मूक संमती असल्याने तालुक्यातील ३२ खाजगी जिनिंग मालकांकडे महसूल विभागाचा १ कोटी ९१ लाख ६ हजार ५३५ रुपये अकृषिक कर थकला आहे. या शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीला ते कर देतच नाहीत. परराज्यातून आलेले काही कापसाचे व्यापारी सिल्लोडमध्ये येऊन मनमानी कशी करू शकतात हा प्रश्न उपस्थित झाला आहे़ या लोकांवर प्रशासन का कारवाई करीत नाही हे एक कोडेच आहे़सिल्लोड तालुक्यातील ज्या खाजगी जिनिंगमध्ये कापूस खरेदी केला जातो, त्यांनी कापूस खरेदीचा कर सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीला भरणे आवश्यक आहे; मात्र यापैकी काही जिनिंग चालक कागदोपत्री कापूस खरेदी खाजगी बाजार समिती मोढा बुद्रुकच्या आवारात दाखवून सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर बुडवत आहेत. महसूल विभागाचा अकृषिक कर, कृ. उ. बाजार समितीचा कर थकविणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई का झाली नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे़सिल्लोड तालुक्यातील जिनिंगनिहाय थकलेला महसूल विभागाचा अकृषिक कर असा : गुरुकृपा जिनिंग ४ लाख ७७ हजार ७२६, जयलक्ष्मी जिनिंग ९,२७,११६, नवीन कोटेक्स ७,९६,४८०, किंजल जिनिंग ४,००३९०, खंडेलवाल जिनिंग ४,३३,६१२, अग्रवाल कोटेक्स ५,५६,९८७, सिल्लोड जिनिंग प्रेसिंग १२,१८,७२२, मुलचंद जिनिंग ४५३६१४, पुनीत इंटरप्राईझेस ८,०५,९०६, प्रदीप फायबर्स ११,५४,९२६, शिवम कॉटन जिनिंग ७,०८,५९८, गौरिशंकर कोटेक्स १०,७१,०६८, आॅईल प्रोजेक्ट मंजित आॅईल २,८५,०५७, राजराजेश्वर कॉटन जिनिंग ९,४७,२६७, हरिओम जिनिंग ७,९६,६७६, अन्वी सहकार जिनिंग प्रेसिंग ९,७१,५९२,जोशी कोटेक्स ५,३९,७२६, सिद्धेश्वर जिनिंग पे्रसिंग ५,७९,३४९, सहकार जिनिंग अजिंठा ४,१४,५१२, साठे जिनिंग अजिंठा ३,९१,४१९, सहकार जिनिंग भराडी ५,२६,२४०, राधा सर्वेश्वर जिनिंग डोंगरगाव ४,९८,७१४, बागवान कोटजिन ३,०१,६३४, सचिन फायबर्स ४,७३,७६६, शिवम फायबर्स ८,६५,३५७, रोकडोबा महाराज जिनिंग लिहाखेडी ४,३८,८०३, ऋषी फायबर्स १०,८१,५६८, मराठवाडा अ‍ॅग्रिकल्चर भराडी - सिल्लोड ४,७५६, शिंदे जिनिंग सावखेडा ९,८४,९५५ असे एकूण १ कोटी ९१ लाख ६ हजार ५३५ रुपये आहे.