शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

औरंगाबादमधील दोन धर्मादाय रुग्णालयांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 16:17 IST

सुविधा आदींची तपासणी करण्यासाठी गुरुवारी शहरातील दोन रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. 

ठळक मुद्दे पथकात धर्मादाय, आरोग्य उपसंचालक, जीएसटी विभागाचे अधिकारी६ वर्षांनंतर तपासणी 

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : गरीब रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सरकारकडून धर्मादाय रुग्णालयांना अनुदान पुरविले जाते. हे अनुदान योग्य रुग्णांवर खर्च झाले का, २० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या का, आदींची तपासणी करण्यासाठी गुरुवारी शहरातील दोन रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. 

धर्मादाय अंतर्गत जिल्ह्यात १७ रुग्णालये व ३ रक्तपेढींचा समावेश होतो. त्यातील डॉ. हेडगेवार रुग्णालय व एमआयटी हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणी गुरुवारी धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. दोन्ही रुग्णालयांत सकाळी ११.३० वाजता सुरू झालेली तपासणी सायंकाळी ५.३० वाजता संपली. गरीब रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सरकारकडून धर्मादाय हॉस्पिटल्सना अनुदान पुरविले जाते. या अनुदानाचा वापर गरीब रुग्णांच्या उपचार, शस्त्रक्रियेवर झाला आहे का. गरिबांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील एकूण खाटांपैकी २० टक्के खाटा राखीव ठेवणे बंधनकारक असते. यासह अन्य नियमांचे पालन करण्यात येते काय, याची तपासणी करण्यात आली. 

यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. यात धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले व राज्य जीएसटीचे सहायक आयुक्त माधव कुंभारवाड यांनी दोन्ही रुग्णालयांत भेट देऊन पाहणी केली. दोन पथकांमध्ये धर्मादाय सहआयुक्त कार्यालय, राज्य जीएसटी विभाग, आरोग्य उपसंचालक कार्यालय, मनपा आरोग्य विभागातील अधिकारी यांचा पथकात समावेश होता. दोन्ही पथकांत सहा-सहा अधिकारी सहभागी झाले होते. मध्यंतरी धर्मादाय आयुक्तांनी एक आदेश काढला होता की, जे रुग्णालय धर्मादाय सवलतीचा लाभ घेत आहे त्यांनी रुग्णालयाच्या नावात धर्मादाय लिहिणे आवश्यक आहे. त्याचीही अंमलबजावणी सर्व रुग्णालयांनी केली का, याबद्दलही यावेळी पाहणी करण्यात आली. मात्र, तपासणीत काय त्रुटी आढळून आल्या, आता पुढे उर्वरित १५ धर्मादाय रुग्णालये व ३ रक्तपेढींची सुद्धा तपासणी करण्यात येणार आहे का, याची माहिती मिळू शकली नाही. 

६ वर्षांनंतर तपासणी यापूर्वी सप्टेंबर २०१३ यावर्षी मुंबईच्या धर्तीवर औरंगाबादेतील १९ धर्मादाय रुग्णालयांची तपासणी करण्यात आली होती. ही तपासणी मोहीम तीन दिवस सुरू होती. त्यात २० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या नाही, आयपीएफचे स्वतंत्र अकाऊंट नव्हते. अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलGSTजीएसटीdoctorडॉक्टर