शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

दोन भाच्यांनी केला मामाचा चाकूने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:15 IST

‘तू आम्हाला खुनाच्या गुन्ह्यात अडकविले,’ असे म्हणून दोन भाच्यांनी मामाचा धारदार चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.१३) रात्री नवाबपूर शिवारात घडली. घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : ‘तू आम्हाला खुनाच्या गुन्ह्यात अडकविले,’ असे म्हणून दोन भाच्यांनी मामाचा धारदार चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.१३) रात्री नवाबपूर शिवारात घडली. घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीधर ऊर्फ मजितराव वाल्मीक काळे (६५), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर रवी श्रीमंत भोसले (२२२), शहानूर सुभाष चव्हाण (१९, दोघे रा. नवाबपूर वाडी), अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले की, गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथील श्रीधर ऊर्फ मजितराव वाल्मीक काळे हे बुधवारी (दि.१३) सायंकाळी नवाबपूर येथील सासुरवाडीस आले होते.दरम्यान, रात्री २.३० वाजेच्या सुमारास घटनेतील मयताचे भाचे रवी भोसले, शहानूर चव्हाण हे तिथे आले व त्यांनी तू आम्हाला खुनाच्या गुन्ह्यात अडकविले असे म्हणून मयताशी वाद घातला.यावेळी आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार चाकूने श्रीधर यांच्या पोटात दहा ते बारा वेळेस भोसकून गंभीर जखमी केले. तसेच जवळ असलेल्या सुभाष मगर यांच्या शेतात आणून टाकले. या घटनेत गंभीर जखमी होऊन श्रीधर यांचा जागीच मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे, गंगापूर ठाण्याचे पोनि. सुनील बिर्ला, सपोनि. जमधडे यांच्यासह पोलीस पथकाने पाहणी केली.अवघ्या तासाभरात पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी रवी भोसले, शहानूर चव्हाण यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.