शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांचा चिमुकला आता सक्षमपणे चालेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:20 IST

अडीच वर्षांचा चिमुकला चालताना अचानक तोल जाऊन पडत होता. नेमके काय झाले, हे आई-वडिलांनीही कळत नव्हते. अखेर डॉक्टरांना दाखविले तेव्हा मेंदूजवळ गाठ असल्याचे निदान झाले. पाच तासांच्या शस्त्रक्रियेत गाठ पूर्णपणे काढण्यात डॉ. भावना टाकळकर यांना यश आल्याने चिमुकल्याला नवीन आयुष्य मिळाले. तो आता सक्षमपणे चालू लागेल, असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देगुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी : पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढली मेंदूजवळील गाठ

औरंगाबाद : अडीच वर्षांचा चिमुकला चालताना अचानक तोल जाऊन पडत होता. नेमके काय झाले, हे आई-वडिलांनीही कळत नव्हते. अखेर डॉक्टरांना दाखविले तेव्हा मेंदूजवळ गाठ असल्याचे निदान झाले. पाच तासांच्या शस्त्रक्रियेत गाठ पूर्णपणे काढण्यात डॉ. भावना टाकळकर यांना यश आल्याने चिमुकल्याला नवीन आयुष्य मिळाले. तो आता सक्षमपणे चालू लागेल, असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला.हिंगोली येथील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलावर ही शस्त्रक्रिया झाली. एमआरआय तपासणीत मेंदूत गाठ असल्याचे निदान झाले. डोक्यात मोठ्या मेंदूच्या खाली आणि लहान मेंदूजवळ साडेसहा बाय सहा सेंटीमीटरची कर्करोगाची गाठ होती. ही गाठ पूर्णपणे काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी आई-वडिलांनी होकार दिला. अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमध्ये डॉ. भावना टाकळकर यांनी गुंतागुंतीची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी केली. अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. प्रदीप राठोड यांचे सहकार्य मिळाले. ही गाठ होण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. शिवाय कुटुंबातही असा कधी कोणाला प्रकार झालेला नाही. शस्त्रक्रियेच्या अवघ्या १५ दिवसांनंतर हा चिमुकला तपासणीसाठी आला होता. तो आता चांगला झाला, तोल जाऊन पडणार नाही, हे सांगताना त्याच्या आईचे डोळे पाणावले होते.प्रमाण अगदी कमीडोक्यामध्ये अशी गाठ होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. गाठीमुळे चालता न येणे, तोल जाणे असे प्रकार होतात. ही गाठ शस्त्रक्रियेने पूर्णपणे निघाली आहे. त्यामुळे सदर मुलगा चालण्यास सक्षम होईल, असे डॉ. भावना टाकळकर यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यdoctorडॉक्टर