शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सत्तावीस हजार ग्राहकांची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:04 IST

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत बिल न भरलेल्या २७ हजार ९८ औद्योगिक ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत बिल न भरलेल्या २७ हजार ९८ औद्योगिक ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १६२ कोटी ७४ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. तथापि, या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने अभय योजना जाहीर केली असून, या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे.सातत्याने मागणी केल्यानंतरही वीज बिल न भरणा-या महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि जळगाव परिक्षेत्रातील तब्बल २७ हजार ९८ औद्योगिक ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अशा ग्राहकांसाठी महावितरणने १ जून ते ३१ आॅगस्ट या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली आहे.ज्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे, अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात जूनमध्ये वीज बिलाची मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना १०० टक्के व्याज व विलंब आकाराची सवलत मिळणार आहे. यानंतर १ जुलै ते ३१ आॅगस्टदरम्यान ज्या ग्राहकांनी वीज बिलाच्या थकबाकीची मूळ रक्कम व व्याजाची २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे, अशा ग्राहकांना ७५ टक्के व्याज व शंभर टक्के विलंब आकाराची रक्कम माफ केली जाणार आहे.१२ वर्षांपेक्षा जास्त काळ न्यायालयीन प्रकरणे असतील व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल, तर संबंधित ग्राहकांनी डिक्रीची रक्कम एकाच वेळी पूर्ण भरल्यास त्या ग्राहकाला १०० टक्के व्याजाची रक्कम माफ केली जाणार आहे.याशिवाय जे १२ वर्षांपर्यंतची न्यायालयीन प्रकरणे असतील व त्यांना न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली आहे, अशा ग्राहकांनी एकाच टप्प्यात डिक्रीची रक्कम भरल्यास त्यांना ५० टक्के व्याजमाफीची सूट मिळणार आहे.या सर्व प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च संबंधित ग्राहकाला करावा लागणार आहे. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीज जोडणी देण्यात येईल.या योजनेत १ जूनपासून ग्राहकांना सहभागी होता येईल, असे प्रादेशिक कार्यालयाने कळविले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल