शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

दोन कोटींच्या कामांसाठी आता नव्याने निविदा

By admin | Updated: September 28, 2016 00:40 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद दोन कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या साखळी सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांसाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या आहेत. या कामांसाठी आधीही निविदा मागविण्यात आल्या होत्या

सुनील कच्छवे , औरंगाबाददोन कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या साखळी सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांसाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या आहेत. या कामांसाठी आधीही निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक कंत्राटदारांनी निविदा दाखलही केल्या; परंतु त्रुटींमुळे सर्व ठेकेदारांच्या निविदा अपात्र ठरल्याचे लघु सिंचन विभागाने म्हटले आहे.दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर साखळी बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. चालू आर्थिक वर्षातही साखळी बंधाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला ठराविक निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार जुलै महिन्यात औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यातील १६ साखळी बंधाऱ्यांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्याला कंत्राटदारांकडून प्रतिसादही मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यातील ३ साखळी सिमेंट बंधाऱ्यांसाठी ७ ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या होत्या. याचप्रमाणे जालना आणि परभणी जिल्ह्यातही अनेक ठेकेदारांनी विहित मुदतीत निविदा भरल्या. परंतु लघु सिंचन विभागाने या सर्व ठेकेदारांच्या निविदा अपात्र ठरविल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता न झाल्याचे कारण देत या निविदा अपात्र ठरविण्यात आल्या. त्यामुळे आता लघु सिंचन विभागाने या कामांसाठी नव्याने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या कामांची एकत्रित किंमत २ कोटी ५ लाख रुपये इतकी आहे. निविदा भरण्यासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.