शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचा तुषार भारतीय तलवारबाजी संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:24 IST

औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू तुषार आहेर याची भारतीय तलवारबाजी संघात निवड झाली आहे. तुषार चीनमधील वुक्सी येथे २२ ते २७ जुलैदरम्यान होणाऱ्या जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी दिली. या स्पर्धेसाठी तुषार आज चीनला रवाना झाला आहे.

औरंगाबाद : औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू तुषार आहेर याची भारतीय तलवारबाजी संघात निवड झाली आहे. तुषार चीनमधील वुक्सी येथे २२ ते २७ जुलैदरम्यान होणाऱ्या जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी दिली. या स्पर्धेसाठी तुषार आज चीनला रवाना झाला आहे.चीनमधील जागतिक स्पर्धेसाठी औरंगाबाद येथे १९ मे ते १८ जुलैदरम्यान विद्यापीठाच्या साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सराव शिबीर सुरू होते. या शिबिरात आपला विशेष ठसा उमटवत तुषारने भारतीय संघातील स्थान निश्चित केले. तुषारने याआधीही गतवर्षी तैवान येथील जागतिक आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच थायलंड येथील बँकॉक येथेही त्याने देशाचे प्रतिनिधित्व करताना आपला ठसा उमटवला आहे. तुषारने आतापर्यंत विविध स्पर्धेत एकूण ४0 पदकांची लूट केली आहे. त्यात त्याने १२ राष्ट्रीय स्पर्धेत ५,३ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत ४ व राज्यस्तरीय स्पर्धेत १७ पदके जिंकली आहेत. चीनमधील जागतिक स्पर्धेतही तुषार भरीव कामगिरी करेल, असा विश्वास उदय डोंगरे यांनी व्यक्त केला.तुषार आहेर याची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, संजय भूमकर, तुकाराम मेहेत्रे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सागर मगरे आदींनी त्याचे अभिनंदन करीत जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.