शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या भडक्याला आणखी हवा; नवीन तूर येऊनही डाळ कडाडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 19:49 IST

तुरीच्या कमी उत्पादनामुळे भाववाढीच्या भडक्याला आणखी हवा मिळाली आहे. 

ठळक मुद्देग्राहकांना बसत आहे फटका क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढअपेक्षित उत्पादन नसल्याचा परिणाम

औरंगाबाद : नवीन तूर बाजारात येताच डाळींचे भाव कमी होतात, असा दरवर्षीचा अनुभव; मात्र यंदा नवीन तुरीची आवक सुरू झाली असतानाही डाळींचे भाव मात्र कडाडले आहेत. मागील आठवड्यात ५०० रुपयांनी भाववाढ होऊन तूर डाळ ६६०० रुपये क्विंटलपर्यंत जाऊन पोहोचली आहे. तुरीच्या कमी उत्पादनामुळे भाववाढीच्या भडक्याला आणखी हवा मिळाली आहे. 

दुष्काळी भागात प्रामुख्याने खरिपात तूर पीक घेण्याकडे मागील काही वर्षांत शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात ४० हजार ५८७ हेक्टरवर तुरीची लागवड होते; मात्र यंदा अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांनी तूर लागवडीत हात आखडता घेतला. परिणामी, ३० हजार ८८३ हेक्टरवरच तुरीची लागवड झाल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते. परतीचा पाऊस पडलाच नसल्याने तूर पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. ६० ते ७० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटल्याचे सांगितले जात आहे. 

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन तुरीची तुरळक आवक सुरू झाली आहे. बुधवारी ३० पोती तूर विक्रीसाठी आली. ५००० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल दराने नवीन तूर खरेदी केली जात आहे. राज्य शासनाने हमीभाव ५५०० रुपये घोषित केला आहे. अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, तुरीचे उत्पादन ६० ते ७० टक्के कमी आहे. सध्या तुरळक आवक सुरू झाली असून, यंदा उत्पादनातील घट लक्षात घेता पुढील महिनाभर हंगाम सुरू राहील, असे वाटते. डाळीच्या एका व्यापाऱ्याने सांगितले की, नवीन तुरीचे उत्पादन कमी असल्याने मिलवाल्यांनी डाळींचे भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे.

मागील आठ दिवसांत तूर डाळ क्विंटलमागे ५०० रुपयांनी वधारली. आज ६२०० ते ६६०० रुपये प्रतिक्विंटल तूर डाळ विकत आहे. २०१५ यावर्षी तूर डाळ १८० ते २२० रुपये किलोपर्यंत उच्चांकी भावात विकली होती. सध्या किरकोळ विक्रीत ७५ रुपये किलोपर्यंत डाळ विकत आहे. 

शेतकऱ्यांना तुरीचा हमीभाव मिळेना सरकारने नवीन तुरीला ५६७५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला आहे. यंदा दुष्काळामुळे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले असतानाही बाजारात तुरीला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळणे अपेक्षित होते. बाजारात शेतकऱ्यांकडून  तूर ५२०० ते ५३०० रुपये प्रतिक्विंटलच खरेदी केली जात आहे. म्हणजे क्विंटलमागे अजूनही ३७५ ते ४७५ रुपये कमी भाव दिला जात आहे. यासंदर्भात अडत व्यापारी कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, एफएक्यू गुणवत्तेची तूर मिळाली तरच सरकार हमीभाव देते; मात्र यंदा पाणी कमी पडल्याने तुरीची गुणवत्ता घसरली आहे. दाणे बारीक पडले आहेत. हिरवट दाण्याचे प्रमाण अधिक आहे, तसेच मुकनीचे प्रमाण अधिक असल्याने तुरीला हमीभाव देणे परवडत नाही, अशी तूर सरकारही खरेदी करणार नाही. 

सरकारी तिजोरीला फटका दुसरीकडे मागील वर्षी सरकारने ५२५० रुपये प्रतिक्विंटलने तूर खरेदी केली होती. तीच तूर सरकारने डाळ मिलवाल्यांना व बड्या व्यापाऱ्यांना ३५०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलने विकली. यात सरकारला क्विंटलमागे १५५० ते १७५० रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला. याच जुन्या तुरीची डाळ करून मिलवाले आज ४५०० ते ४७०० रुपये क्विंटल विकत आहेत. 

चार महिन्यांत डाळींच्या दरात झालेली वाढडाळ             आॅगस्ट २०१८    नोव्हेंबर २०१८तूर डाळ        ५१०० ते ५३०० रु.    ६२०० ते ६६०० रु.उडीद डाळ    ३७०० ते ४००० रु.    ५८०० ते ६५०० रु.हरभरा डाळ   ४७०० ते ५००० रु.    ५७०० ते ६१०० रु.मूग डाळ        ६००० ते ६३०० रु.    ६८०० ते ७३०० रु.मसूर डाळ      ४५०० ते ४७५० रु.    ५००० ते ५३०० रु.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार