मुजीब देवणीकर । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पुण्यातील ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची औरंगाबाद महापालिकेत विशेष चौकशी अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली. बुधवारी सकाळी ते महापालिकेत दाखल होणार आहेत.राज्य शासनाने मुंढे यांची नेमणूक औरंगाबाद महापालिकेत विशेष चौकशी अधिकारी म्हणून केली आहे. बुधवारी सकाळीच ते महापालिकेत दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत पिंप्री-चिंचवड महापालिकेचे उपायुक्तही राहणार आहेत. २०१० ते २०१४ या चार वर्षांमध्ये महापालिकेत तब्बल २५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती केली. ही भरती नियमबाह्य आहे. यामध्ये अनेक नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या भरती घोटाळ्यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित झाला. मनपा प्रशासनाने नेहमीप्रमाणे या तारांकित प्रश्नावर सारवासारव करणारे उत्तर शासनाला पाठवून दिले; मात्र शासनाने आता हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून, त्याची चौकशी करण्यासाठी ‘खास’ तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली आहे. २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले तुकाराम मुंढे यांना कोणत्याही जागेवर नेमणूक दिल्यावर ते आपल्या कार्याचा ‘ठसा’ उमटवत असल्याचे दिसते. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी अतिक्रमणे, भ्रष्टाचार, अनियमिततेविरुद्ध कारवाईचा बडगाच उगारला. अत्यंत कडक, शिस्तप्रिय असलेल्या मुंढे यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई केली. वेळप्रसंगी सरकारच्या विरोधातही अनेकदा त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. महापालिकेत त्यांना अविश्वास ठरावाचा सामना करावा लागला. नंतर राज्य शासनाने त्यांचे पुनर्वसन ‘पीएमपीएमएल’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी केले. अधिकारी हवालदिलतुकाराम मुंढे यांची नियुक्ती होताच महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी ते महापालिकेत दिवसभर तळ ठोकून भरती घोटाळ्यातील प्रत्येक कागद तपासणार आहेत. घोटाळ्याचा गोपनीय अहवाल ते राज्य शासनाला सादर करणार आहेत. या कामासाठी त्यांना पिंप्री-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त मदत करणार आहेत.
तुकाराम मुंढे आज औरंगाबाद महापालिकेत!
By admin | Updated: July 12, 2017 00:48 IST