शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

खदाणीच्या जागा हडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 21:40 IST

बजाजनगरातील मोहटादेवी व रामलीला मैदानासमोरील खदाणीच्या जागा हडपण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जात आहे.

वाळूज महानगर : बजाजनगरातील मोहटादेवी व रामलीला मैदानासमोरील खदाणीच्या जागा हडपण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जात आहे. त्यासाठी या खदाणीत मुरुम-माती टाकुन त्या बुजविण्याचे काम खुलेआमपणे सुरु आहे. एमआयडीसी प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने या खदानीवर अतिक्रमणे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बजाजनगरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या खदाणीच्या जागेवर अनेकांचा डोळा आहे. विशेष म्हणजे या जागेवर अतिक्रमण करण्यासाठी काहींनी ट्रॅक्टर, ट्रक व हायवाद्वारे मुरुम-माती आणून टाकली जात आहे. आजघडीला जवळपास २० एकर परिसरात ठिकठिकाणी मुरुम-मातीचे ढिगारे साचलेले दिसून येतात. मुरुम-माती टाकल्यानंतर खदाणीचे सपाटीकरण केले जात आहे. विशेष म्हणजे एमआयडीसीचे अधिकारी व कर्मचारी बजाजनगर परिसरात सतत पाहणी करीत असतात. मात्र, खदानीवर होत असलेल्या अतिक्रमणाकडे या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

खदाणीच्या जागेवर उद्यान उभारणारएमआयडीसी प्रशासनाच्या वतीने या खदाणीच्या जागेवर उद्यान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार वसाहतीत एकही खेळाचे मैदान नसल्याने बच्चे कंपनीला शहरातील उद्यानात जावे लागते. या संदर्भात मुंबईच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावाही करण्यात येत असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजEnchroachmentअतिक्रमण