शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

दोन समाजात तेढ वाढविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST

बीड: माजलगाव धरणातील ठेका रद्द करण्यासाठी मच्छीमारांचे गेल्या दहा वर्षांपासून भांडण आहे. हा वाद ठेकेदार माणिकशहा व भोई समाजाच्या लोकांमध्ये असून याला जातीय रंग देण्यात येत आहे.

बीड: माजलगाव धरणातील ठेका रद्द करण्यासाठी मच्छीमारांचे गेल्या दहा वर्षांपासून भांडण आहे. हा वाद ठेकेदार माणिकशहा व भोई समाजाच्या लोकांमध्ये असून याला जातीय रंग देण्यात येत आहे. त्यामुळेच हे प्रकरण गंभीर बनले आहे. पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी भोई समाजाच्या नागरिकांशी भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. माजलगाव येथील कॅम्प परिसरात महिला पुरुष मच्छीमारांवर माजलगाव धरणाच्या ठेकेदाराच्या गुंडानी शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हल्ला केला होता. या हल्ल्यात आठ महिला व चार पुरुष गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धरणातील मासेमारीवरच भोई समाजाची उपजिविका आहे. मत्सव्यवसायाचे कंत्राट दिले असल्याने भोई समाजावर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे ते सतत संघर्ष करत आहेत. यापूर्वी माजी न्या. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणावर आंदोलन करण्यात आले होते. मच्छीमार वारंवार आंदोलन करीत असल्याने त्यांना गुंडाकरवी मारहाण केली जात असल्याचा आरोप जखमींनी केला आहे. मारहाणीचे प्रकरण समोर येण्यापूर्वीच अ‍ॅट्रॉसिटीगुंडांनी धरणाजवळ मच्छीमारांना मारहाण केली होती. मच्छीमार पोलीस ठाण्यात येण्यापुर्वीच सिद्धार्थ भानुदास साळवे यांच्या फिर्यादीवरुन उद्धव नाईकनवरे, पांडुरंग घटे, परमेश्वर घटे, गंगाधर घुंगासे, त्रिंबक कचरे यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर सिद्धार्थ नाथा घडले यांच्या फिर्यादीवरुन आयुब आत्तार यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्नमाजलगावात हिंदु-मुस्लिम बांधवांचा सलोखा कायम आहे. मात्र या वादात दोन समाजाच्या लोकांना ओढून वाद चिघळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे हे प्रकरण गंभीर बनत चालले होते. यावर पोलिसांना कठोर भूमिका घेऊन कोणाताही गैरप्रकार होणार नाही याच दक्षता घेतली. ‘त्या’ महिलेच्या गर्भपाताची शक्यता माजलगाव येथील कॅम्प परिसरात महिला पुरुष मच्छीमारांवर माजलगाव धरणाच्या ठेकेदाराच्या गुंडांनी शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हल्ला केला. यात राधा लिंबोरे या गर्भवती महिलेच्या पोटावर गुंडानी लाथा मारल्या होत्या. त्यामुळे पोटातील बाळाचा गर्भातच मृत्यू झाला होता. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी गर्भ मृत झाला असल्याने तीन दिवसांत गर्भपात करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी तिचा गर्भपात होण्याची शक्यता जिल्हा रुग्णालयात सूत्रांनी वर्तवली आहे.विविध संघटनांकडून माजलगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात तीन जखमींवर उपचार सुरू आहेत. घडलेल्या घटनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, गुंडांनी आम्हाला बेदम मारहाण केली. पुरुषांनी स्त्रियांवर हात उचलले हे कितपत योग्य आहे? असा प्रती सवालही त्यांनी केला. दरम्यान, ज्याठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या जखमींना कोणताही त्रास होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे. शनिवारी दुपारी जखमींचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत. रविवारी माजलगावमध्ये शांतता होती. (प्रतिनिधी) अधीक्षकांनी घेतली माजलगावात बैठकमाजलगाव येथील दहा ते बारा जणांना शुक्रवारी मारहाण झाली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हणून पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी शनिवारी माजलगावात तळ ठोकुन होते. त्यांनी भोई समाज वस्तीवर जाऊन बैठक व जखमींच्या कुटूंबियांशी चर्चा केली. माजलगाव येथे झालेल्या वादासंर्दभात बोलताना अधीक्षक रेड्डी म्हणाले की, मच्छीमार व ठेकेदार यांचा वाद अनेक वर्षापासून आहे. याला काही व्यक्ती जातीय रंग देत आहेत. काही व्यक्ती हे प्रकरणी चिघळविण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे आवाहन अधीक्षक रेड्डी यांनी केले आहे.