शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:11 IST

भरधाव ट्रक अचानक वळण घेवून दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला

वाळूज महानगर : भरधाव ट्रक अचानक वळण घेवून दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी रात्री औरंगाबाद-नगर महामार्गावर वाळूजजवळील साई पेट्रोलपंपासमोर घडली. विनोद गणेश बताडे (२४, रा. पदमपुरा, औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे.

विनोद गणेश बताडे (२४) व मनोज उर्फ मुकेश मनोहर बरंडवाल (२२, रा. सदर) हे शुक्रवारी सायंकाळी दुचाकीवरुन (एमएच-२०, ईझेड- ३३४२) पैसे घेण्यासाठी वाळूज येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने घरी जात होते. यावेळी विनोद बताडे हा दुचाकी चालवत होता. तर मनोज हा पाठीमागे बसला होता. वाळूज लगत असलेल्या साई पेट्रोलपंपाजवळ रात्री १० वाजेच्या दरम्यान पाठीमागून भरधाव ट्रकने (एमएच-२१-एक्स २३७३) अचानक पेट्रोलपंपाकडे वळण घेतले.

दरम्यान, ट्रकच्या पाठीमागील भागाची दुचाकीला जोराची धडक बसली. यात विनोद जागेवरच बेशुद्ध पडला. तर मनोज गंभीर जखमी झाला. घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला. शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री साडेअकरा वाजेता विनोदचा मृत्यू झाला. तर मनोजवर खाजगी रुग्णालया उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयसर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार लक्ष्मण उंबरे हे करित आहेत.

टॅग्स :WalujवाळूजAccidentअपघात