शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले

By admin | Updated: September 18, 2016 01:59 IST

औरंगाबाद : मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड बायपास रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.

औरंगाबाद : मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड बायपास रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. परिणामी या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून, शनिवारी दुपारी एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले तर त्यांच्या दोन चिमुकल्या मुली जखमी झाल्या. या भीषण अपघाताचे दृश्य पाहून संतप्त नागरिकांनी पळून जात असलेल्या ट्रकचालकाला चोप दिला आणि ट्रकवर दगडफेक केली.फईम शेख (३५) आणि नसरीन फईम शेख (३०, रा. पारुंडी, ता. पैठण) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेत जरीन शेख (६) आणि फराहन (३) या दोन मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, फईम शेख हे पत्नी आणि दोन मुलींसह मोटारसायकलने पारुंडी येथून औरंगाबादला येत होते. सिग्मा हॉस्पिटल येथे त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचे होते. तर त्यांना उडविणारा ट्रक हा जालना येथून औरंगाबादमार्गे गुजरातला निघाला होता. फईम हे देवळाई चौकातून शहरात येण्यासाठी आपली दुचाकी वळवत असतानाच त्यांच्या मागून वेगात आलेल्या रिकाम्या ट्रकने (क्र. जीजेयू -६७७७) त्यांना जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, फईम हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन मेंदू बाहेर आल्याने ते घटनास्थळीच ठार झाले. त्यांच्या पत्नीच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या घटनास्थळी बेशुद्ध पडल्या होत्या. रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरीन आणि फराहन या मुलींना किरकोळ जखमा झाल्या असून, या भीषण अपघातात त्या बालंबाल बचावल्या.ट्रकचालकास चोप आणि ट्रकवर दगडफेकया अपघातानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ट्रकचालकास नागरिकांनी चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी ट्रकचालक राजकुमार राधेश्याम यादव (रा. वापी, गुजरात) यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. यावेळी काही लोकांनी ट्रकवर दगडफेक करून समोरच्या काचा फोडल्या.प्रत्यक्षदर्शी धावले मदतीला...या अपघाताचे भयावह दृश्य पाहून अनेक जण मदतीला धावले. यावेळी फईम यांच्या मेंदूचा चेंदामेंदा झाल्याने ते जागीच गतप्राण झाल्याचे पाहून लोकांनी त्यांच्या प्रेतावर कपडा टाकला. तर गंभीर नसरीन आणि दोन्ही बालिकांना जखमी अवस्थेत उचलून रुग्णालयात पाठविले. देवळाई चौकातील दुकानदार आणि अन्य वाहनचालकांनी प्रथम घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत मोठी गर्दी जमली होती. अपघातानंतर वाहनांधारकांना घाईच....अपघात घडल्यानंतर देवळाई चौकात नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. ट्रकखाली दबलेल्या मृताचे शव आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रत्यक्षदर्शी घाई करीत होते. या परिस्थितीतही काही वाहनचालक सिग्नल तोडून तेथून जाण्यासाठी घाई करीत होते. अत्यंत वर्दळीचा आणि दक्षिणेकडील शहराचे प्रवेशद्वार म्हणून देवळाई चौक ओळखला जातो. बीड बायपासच्या पलीकडे मोठी नागरी वसाहत निर्माण झाल्याने या चौकातून ये- जा करणाऱ्या वाहनचालकांची संख्याही वाढली आहे.नागरिकांनी केली पोलिसांना मदतअपघातामुळे काही काळ वाहने थांबविण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि काही वाहनचालक पुढे जाण्याची घाई करीत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. यावेळी चौक परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी स्वत: रस्त्यावर उभे राहून पोलिसांना मदत करून तेथील वाहनांचा मार्ग मोकळा केला. यामुळे वाहतूक सुरळीत झाली.दोन सहायक आयुक्तांसह पाच पोलीस निरीक्षकअपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केल्याचे कळताच वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सी. डी. शेवगण, उस्मानपुरा विभागाच्या सहायक आयुक्त मकवाना यांच्यासह सातारा ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे, जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर, मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक अनिल आढे, उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक सुरेश टाक, वाहतूक शाखेचे निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. याप्रकरणी ट्रकचालक राजकुमार यादव यास अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक भारत काकडे यांनी दिली.