शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कवली बसस्थानकात घुसला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:26 IST

प्रवासी शेड कोसळले : आठ प्रवासी बालंबाल बचावले

सोयगाव : सोयगावकडून धुळ्याकडे रासायनिक खताने भरलेल्या भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने तो सरळ कवली गावाच्या बसस्थानकात घसल्याने प्रवासी शेड कोसळून नुकसान झाले. यावेळी प्रसंगावधान राखल्याने आठ प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना बुधवारी पहाटे घडली. दरम्यान, बसस्थानकावरून नुकतीच पहिलीच बस निघून गेली आणि शालेय विद्यार्थ्यांचीही बस नुकतीच गेल्याने मोठा अनर्थ टळला.या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी ट्रकचालक आकाश बडगुजर (२०, रा.देवपूर धुळे) यास ताब्यात घेतले आहे. सोयगाव-चाळीसगाव राज्य मार्गावरून सोयगावकडून धुळ्याकडे जाणारा ट्रक (क्र. एम.एच.-१८-एए-८९३२) हा भरधाव वेगाने जात असताना कवली गावाजवळील बसस्थानकाजवळ ब्रेक निकामी झाले. चालकाचेही यामुळे नियंत्रण सुटले अन् ट्रक बसस्थानकात आरपार शिरल्याने क्षणार्धात बसस्थानक कोसळले. या वस्तीच्या बाजूलाच ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत आहे. ट्रक उजव्या बाजूने वळून वस्तीत अथवा ग्रामपंचायतीमध्ये शिरला असता, तर अनर्थ झाला असता.सोयगाव आगाराची पाचोरा-औरंगाबाद ही बस नुकतीच या बसस्थानकावरून निघून गेली होती. या बसमध्ये बसस्थानकातून पाच प्रवासी निघून गेल्यावर आणि आठ प्रवासी मालेगाव-सोयगाव या दुसऱ्या बसची प्रतीक्षा करत येथे थांबलेले होते. ट्रक बसस्थानकात घुसत असल्याचे काही क्षणात प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. पोलीस पाटील निवृत्ती पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजानन हाळनोर, सीताराम पाटील, अनिल धनेधर, बाजीराव केंडे, उखर्डू साळवे, सरदार तडवी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी पंचनामा करून चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Accidentअपघात