शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

वºहाडाच्या टेम्पोला तिहेरी अपघात

By admin | Updated: May 26, 2014 00:26 IST

नळदुर्ग : वºहाडी मंडळींना घेऊन निघालेल्या ट्रकने टमटमला पाठीमागून धडक देत समोरून येणार्‍या ट्रकलाही धडक दिली़ या अपघातात १४ वºहाडींसह १६ जण जखमी झाले

नळदुर्ग : वºहाडी मंडळींना घेऊन निघालेल्या ट्रकने टमटमला पाठीमागून धडक देत समोरून येणार्‍या ट्रकलाही धडक दिली़ या अपघातात १४ वºहाडींसह १६ जण जखमी झाले असून, यातील ६ गंभीर जखमींना सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ हा अपघात रविवारी दुपारी नळदुर्ग नजीक राष्ट्रीय महामार्गावर घडला़ पोलिसांनी सांगितले की, रामतीर्थतांडा (ता़तुळजापूर) येथील ६० वºहाडींना घेऊन रविवारी दुपारी ट्रक (क्ऱ एम़एच़२५- यू़ ६१३) हा फुलवाडी तांड्याकडे जात होता़ नळदुर्ग नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावरील खंडोबा पणन नजीक अणदूरकडे जाणार्‍या टमटमला ट्रकने पाठीमागून धडक दिली़ तर सोलापूर येथून हैदराबादकडे जाणार्‍या ट्रकलाही (क्ऱए़पी़०४- व्ही़६०७०) समोरून जोराची धडक दिली़ अपघातानंतर ट्रकच्या टपावर बसलेली वºहाडी मंडळी रस्त्यावर पडली़ या अपघातात भारतबाई राठोड (वय ४०), चांदूबाई राठोड (५२), नेमाबाई राठोड (५०), सुरताबाई राठोड (६०), गुनाबाई राठोड (६५), अंजना राठोड (७०), मोसाबाई राठोड (७०), सचिन चव्हाण (१५), सूरज राठोड (१६), रवींद्र राठोड (१९), अतुल राठोड (१७), राहुल राठोड (१७), सुशीला राठोड (३५) या वºहाडींसह टमटममधील प्रशांत धर्मराज कनकधर (रा़नळदुर्ग), दुसर्‍या ट्रकमधील शिराजोद्दीन उस्मानसाब शेख (५५) हे जखमी झाले़ सदरील अपघातातील जखमींवर नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले़ गंभीर जखमी भारतबाई राठोड, चांदूबाई राठोड, सुरताबाई राठोड, नेमाबाई राठोड, मोताबाई राठोड यांना सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या प्रकरणी प्रशांत कनकधर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा अधिक तपास हेकॉ बजरंग सरपाळे हे करीत आहेत़ (वार्ताहर)