औरंगाबाद : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले; परंतु डांबरीकरण होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी होत नाही तोच आवारातील रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज विविध मार्गांवरील हजारो बस ये-जा करतात. गेल्या काही दिवसांपासून स्थानकाच्या आवारात खड्डे पडले आहेत; परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते, त्यामुळे बसस्थानकात प्रवेश करताना आणि बसस्थानकातून बाहेर पडताना खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अशा खड्ड्यांमधून सातत्याने ये-जा केल्यामुळे गाड्यांचे विविध पार्ट खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मे महिन्यात बसस्थानक आवारातील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात आले होते, त्यामुळे बसस्थानकातून ये-जा करताना प्रवाशांना खड्ड्यांमुळे होणारा त्रास काही दिवस थांबला; परंतु अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत पुन्हा खड्ड्यांच्या त्रासाला प्रवाशांसह एसटी चालकांना सामोरे जावे लागत आहे. या विदारक परिस्थितीमुळे ऐतिहासीक शहराचे नाव धुळीस मिळत आहे.
मध्यवर्ती स्थानकात एसटीचा खड्डेमय रस्त्यातून प्रवास...!
By admin | Updated: September 4, 2014 00:51 IST