शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कचराकोंडी फुटणार पुढच्या वर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:31 IST

शहरातील कचराप्रश्नी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. शहरातील कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी आणखी सहा महिने लागणार असल्याची कबुली सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देऔरंगाबाद मनपा आयुक्त : कालबद्ध कार्यक्रम राबविण्यास वेळ लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचराप्रश्नी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. शहरातील कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी आणखी सहा महिने लागणार असल्याची कबुली सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयाला दिलेल्या शपथपत्रानुसार मागील ९० दिवसांमध्ये महापालिकेला काहीच काम करता आले नाही. याबद्दल पुन्हा एकदा न्यायालयाची दिलगिरी व्यक्त करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.शहरातील कचरा उचलणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी एकच निविदा काढण्यात येत आहे. कचरा उचलणे म्हणजे चौकाचौकातील कचरा उचलणे नव्हे, तर डोअर टू डोअर कलेक्शनची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. या कामासाठी त्याने सुचविलेल्या दरानुसार पैसे देण्यात येतील. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी कंत्राटदाराला कोणत्या मशीन हव्यात त्या महापालिका खरेदी करून देईल. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मनपा एक रुपयाही देणार नाही. दीडशे मेट्रिक टनचे तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. सध्या महापालिका खाजगी रिक्षा, चालक, डिझेल आदींसाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च करीत आहे. यातील एक टप्पाही विस्कळीत झाल्यास शहरात कचºयाची ओरड होते. या सर्व बाबींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत शंभर टक्के प्रक्रिया होईल.शहरात ठिकठिकाणी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडून असलेल्या कचºयाचे वर्गीकरण करून तो उचलण्यात येईल. यासाठी किमान आठ दिवसांचा वेळ लागेल.या कामासाठी कचरा वेचकांची मदत घेतली जाईल. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डातील कचरा तेथेच जिरावा यादृष्टीनेही प्रयत्न होतील. शासनाने सुचविलेल्या डीपीआरमध्ये काही बदल करायचे असतील तर ते शासनाला सांगून बदल केले जातील.नागरिकांनी विश्वास का ठेवावा?मागील तीन महिन्यांपासून महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी कचरा प्रश्नात निव्वळ घोषणा करीत आहेत. आता तरी नागरिकांनी मनपावर का विश्वास ठेवावा, या प्रश्नावर महापौर, आयुक्त यांनी नमूद केले की, न्यायालयाला दिलेल्या शपथपत्रानुसारच काम होत आहे. या कामात विलंब झाला, हे आम्हाला मान्य आहे. रमजाननिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. व्यापाºयांना नोटिसा देण्याचे आदेशही महापौरांनी दिले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादCourtन्यायालय