तुळजापूर : पिण्यासाठी व जनावरांसाठी साठवण तलावातील बोअरमधून पाण्याचा उपसा करण्यासाठी परवाना मिळवून देतो म्हणून शेतकऱ्याकडून एक हजार रूपयांची लाच घेणारा उस्मानाबाद पाटबंधारे उपविभागाचा (क्ऱ६) तुळजापूर येथील कालवा संदेश वाहक सुभाष विठ्ठल जाधव यांना ‘एसीबी’ने जेरबंद केले़ ही कारवाई सोमवारी सकाळी तुळजापूर येथील उस्मानाबाद पाटबंधारे उपविभागाच्या (क्ऱ६) कार्यालयात करण्यात आली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील एका शेतकऱ्याची गावच्या शिवारात जमीन असून, या जमिनीत दोन विहिरी, दोन कुपनलिका आहेत़ ही जमीन कृष्णाखोरे प्रकल्पांतर्गत तडवळा साठवण तलावासाठी संपादीत झाली आहे़ संपादीत शेताजवळच तक्रारदार शेतकरी राहतो़ निर्माण झालेली पाणीटंचाई पाहता पिण्यासाठी पाणी व जनावरांसाठी संपादीत बोअरमधील पाणी उपसा करण्यासाठी परवाना मिळावा म्हणून त्या शेतकऱ्याने उस्मानाबाद पाटबंधारे उपविभाग क्रमांक सहाच्या तुळजापूर कार्यालयातील कालवा संदेशवाहक (चौकीदार) सुभाष विठ्ठल जाधव यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली़ त्यावेळी संदेशवाहक सुभाष जाधव यांनी वरिष्ठांकडून पाणी उपसा परवाना मिळवून देण्यासाठी त्या शेतकऱ्याकडे पाच हजार रूपये लाचेची मागणी करून त्याशिवाय परवाना मिळणे शक्य नसल्याचेही सांगितले़पाच हजार रूपये लाचेची मागणी होताच त्या शेतकऱ्याने उस्मानाबाद येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून रितसर तक्रार केली़ या तक्रारीनुसार उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी पोलीस अधीक्षक अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अपर पोलीस अधीक्षक गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी तुळजापूर येथील उस्मानाबाद पाटबंधारे उपविभाग क्रमांक सहाच्या तुळजापूर कार्यालयात सापळा रचला़ त्यावेळी तक्रारदाराकडे संदेशवाहक सुभाष जाधव यांनी ५ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती एक हजार रूपये स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास उपाधीक्षक अश्विनी भोसले या करीत आहेत़ (प्रतिनिधी)
कालवा संदेशवाहक ‘एसीबी’च्या जाळ्यात
By admin | Updated: March 22, 2016 01:15 IST