शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडी सुटणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:55 IST

वळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. पालकमंत्री पंकजा मुंडे यांची गाडी या पूलावरुन धावून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी दिली.बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मिनी बायपास आणि शहरातून वाहतूक वळविल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: जड वाहतूक वाहनांमुळे रस्ता सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. शहरातून जाणाºया धुळे-सोलापूर या राष्टÑीय महामार्गावर वळण रस्त्याचे काम पूर्ण युद्धपातळीवर पूर्ण करुन ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.१४ सप्टेंबर रोजी विनायक मेटे यांनी या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, आयआरबीचे रवींद्र चौरे, जि.प. सदस्य अशोक लोढा, दत्ता गायकवाड, अ‍ॅड. राहुल मस्के, सुहास पाटील, सुशांत सत्राळकर, मनोज जाधव आदी उपस्थित होते.हा वळण रस्ता साडेबारा कि.मी. अंतराचा असून, यापैकी फक्त दीड कि.मी.चे काम बाकी आहे. पावसामुळे या कामात अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावर छोटे-मोठे सहा पूल असून, ते काम पूर्ण झाले आहे. एडशी ते औरंगाबाद असे १९० कि.मी.चा रस्ता काम चालू असून, हा मार्ग पूर्ण करण्याचे काम कंपनीतर्फे युद्धपातळीवर चालू आहे. ३६ महिन्यात हे काम पूर्ण करण्याची मुदत असली तरी ३० महिन्याच्या आतच हा मार्ग पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू आहेत. या वळण रस्त्याची एकेरी वाहतूक काम पूर्ण करुन सुरु करण्याचा प्रयत्न होत आहे. यावेळी कंपनीच्या अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. विनायक मेटे म्हणाले, मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर या कामास वेग आला आहे.या रस्त्याची पाहणी केल्यानंतर मेटे यांनी वाहून गेलेल्या पर्यायी पूलासही भेट देऊन कामाचा आढावा घेतला. सध्या पावसामुळे बिंदूसरा नदीस पूर येत आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही.