शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

महामार्गावर तब्बल दीड तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:23 IST

औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बिल्डा फाटा ते चौक्यापर्यंत शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गणोरी फाट्यानजीक झाड तोडताना रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद होऊन सुमारे दीड तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. याचा प्रवाशांना ताटकळत थांबून त्रास सहन करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बिल्डा फाटा ते चौक्यापर्यंत शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गणोरी फाट्यानजीक झाड तोडताना रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद होऊन सुमारे दीड तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. याचा प्रवाशांना ताटकळत थांबून त्रास सहन करावा लागला.औरंगाबाद -जळगाव महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या नावाखाली रस्त्याच्या दोन्ही बाजूंची ५० वर्षे जुनी झाडे तोडल्या जात आहेत. रस्ता चौपदरीकरण करण्याला आणखी अधिकृत मंजुरी मिळाली नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. पण झाडे तोडण्याचा सपाटा सुरूच आहे. संबंधित झाडे तोडण्याचा ठेका ज्यांना देण्यात आला, त्यांच्याकडे झाडे तोडण्याचे मोठे साधन नाही.रस्त्यावर झाड पडले तर त्याला तात्काळ हटविण्याची यंत्रणा नाही, अशा परिस्थितीत झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली कशी, असा प्रश्न पडत आहे. या प्रकाराची चौकशी करणे आवश्यक झाले आहे.शुक्रवारी सकाळी सुमारे तीन कि. मी. लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. यात दोन रुग्णवाहिकाही अडकल्या होत्या.फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंदोबस्तासाठी करमाडला गेले होते. त्यांना वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळाली असता ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या वाहतूक ठप्प प्रकरणात अडकलेल्या प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.या महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. झाडे तोडताना याची माहिती पोलिसांना देण्यात येत नाही. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्यावर पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहचत नाहीत.च्ठेकेदारांना यापूर्वी अनेक वेळा पोलिसांनी सूचना दिल्या पण ते पोलिसांना जुमानत नाही. शिवाय त्यांच्याकडे यंत्रणा नसल्याने झाड रस्त्यावरून बाजूला हटविताना वेळ लागतो. या काळात वाहनधारक कंटाळून जातात.