परतूर: परतूर आष्टी रेल्वेगेटवर सोमवारी मंत्र्याच्या ताफयालाच ‘ट्रॅफिक जाम’ चा फटका बसला बराचवेळ गेट बंद असल्याने वाहतुकीची कोंडी झाली व मंत्र्याचा आष्टीकडे जाणारा ताफा अडकून पडला.आष्टी येथे एका कार्यक्रमासाठी पालकंत्री बबनराव लोणीकर व खा. रामदास आठवले यांच्या गाडयाचा ताफा हा चारच्या सुमारास जात होता यावेळी काचीगुडा -मनमाड रेल्वेची वेळ झाल्याने रेल्व गेट बंद झाले होते, यामुळे या गेटवर या ताफयासह मोठया प्रमाणात वाहने खोळंबली. रेल्वे गेल्यानंतर गेट उघडले मात्र, वाहतूकीची कोंडी झाली. यावेळी ट्राफिक पोलिसही या ठिकाणी नव्हता, यामुळे वाहनांची कोंडी कोण सोडणार असा प्रन निर्माण झाला, त्यावेळ मंत्रीमहोदयाच्या ताफयातीलच पोलिस खाली उतरले व वाहतूक मोकळी केली, आष्टी रेल्वे गेटवरील वाहतुकीची कोंडी स्वत: कॅबीनेट मंत्री बबनराव लोणीकर व खा. रामदास आठवले यांनीच अनुभवली, असा अनूभव दररोजच नागररिकांना येतो, तासन्तास याठिकाणी वाहतुकीच खोळंबा होतो. आता तरी या गेटवरील उड्डाणपुलाचा प्रश्न गतीने मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
मंत्र्याच्या ताफ्याला ‘ट्रॅफिक जाम’चा फटका
By admin | Updated: May 12, 2015 00:48 IST