शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

 ऐतिहासिक दिल्ली दरवाजाला ट्रक धडकल्याने वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:18 IST

ऐतिहासिक दिल्ली दरवाजाला सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ट्रक धडकल्याने महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाल्याने वाहनधारक व प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

दौलताबाद : ऐतिहासिक दिल्ली दरवाजाला सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ट्रक धडकल्याने महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाल्याने वाहनधारक व प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.औरंगाबाद -खुलताबाद महामार्गावर कन्नडकडून औरंगाबादकडे जाणारा ट्रक क्र. एमएच -ईजी -५८५८ हा दौलताबाद घाट उतरत असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक ऐतिहासिक दिल्ली दरवाजाला धडकला. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी ट्रकचे नुकसान झाले. अपघातानंतर चालक फरार झाला. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहनांच्या एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत रांगाच रांगा लागल्या होत्या. सध्या सुट्या असल्यामुळे पर्यटकांची वाहने मोठ्या प्रमाणात येत आहेत. दोन तास वाहतूक ठप्प असल्यामुळे अनेक पर्यटकांना पर्यटन स्थळावर वेळेत पोहोचता आले नाही. अनेक पर्यटक पायी चालताना दिसले.घटनास्थळी छावणी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक इलियास पठाण, श्रीकांत राठोड, आर.पी. जाधव, अब्दुल चाऊस, अनिल पवार, जी.एम. राठोड, मारुती गुंजाळ, दौलताबादचे पोलीस सचिन त्रिभुवन, अशोक शेळके, जमील शेख, सय्यद खलील, वसीम शेख, शेख जुनेद यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला करण्यात आला. घाटाकडून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. दोन तासात शेकडो वाहनधारकांचे हाल झाले.फोटो... दौलताबाद येथील ऐतिहासिक दिल्ली दरवाजाला ट्रक धडकल्याने या महामार्गावर जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या अशा रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस