शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

तीर्थखांबावर गुढी उभारून जोपासली परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 19:24 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शोभा यात्रा रद्द करून येथील ऐतिहासिक तीर्थखांबावर मंगळवारी गुढी उभारून परंपरा जोपासण्यात आली. 

पैठण : शककर्ता शालिवाहन राजाच्या दैदिप्यमान कारकिर्दीचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पैठण येथे मराठी नववर्षाचा जनक व पैठण भूमिपुत्र शालिवाहन राजाच्या प्रतिमेसह शालिवाहन शक शुभारंभ शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शोभा यात्रा रद्द करून येथील ऐतिहासिक तीर्थखांबावर मंगळवारी गुढी उभारून परंपरा जोपासण्यात आली. 

पैठणच्या सातवाहन घराण्याने जवळपास ४५० वर्षाहून अधिक काळ शासन केले. त्यांच्या साम्राज्याची राजधानी पैठण नगरी होती. सातवाहन सम्राट पुलुमावी याने उज्जैनच्या विक्रमादित्याच्या प्रचंड सैन्याचा पराभव करून विजयाचे स्मरण रहावे म्हणून मराठी कालगनणेस चैत्र शुध्द प्रतिपदेस प्रारंभ केला. पैठण शहरात असलेल्या शालीवाहनाच्या राजवाड्याच्या बाजूला भव्य अशी दगडी शिल्पाची गुढी उभारली. आज यास तीर्थखांब म्हणून ओळखले जाते. मराठी नववर्षाच्या या दिनासोबत शालिवाहनांचा वैभवशाली ईतिहास जोडलेला असल्याने पैठण नगरीस आजच्या दिनाचे महत्व काही औरच असते. मात्र, कोरोनाचे संकट समोर असल्याने आजचा उत्सव रद्द करून पैठणकरांनी परंपरा खंडीत होऊ नये म्हणून तीर्थखांबावर माजी नगराध्यक्ष शेखर पाटील यांनी मंगळवारी गुढी उभारून अभिवादन केले.

यावेळी उत्सव समितीचे सागर पाटील, रमेश खांडेकर, दिनेश पारीख, ईतिहास संशोधक जयवंत पाटील, आयुधसिंग पाटील, शंभु रूपेकर, हर्षवर्धन पाटील, महेश रूपेकर, धनराज चितलांगी, राजू रूपेकर, विष्णू ढवळे, संजय रूपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील यांचे  स्मारक करावे, तीर्थस्तंभास राष्ट्रीय स्मारक घोषित करावे अशी मागणी केली. पैठण येथे ८ एप्रिल १९७८च्या वर्षप्रतिपदेला शालिवाहन समारोह साजरा करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. या पहिल्याच कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू बी. आर. भोसले आणि इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. पंढरीनाथ रानडे यांनी आवर्जून हजेरी लावली होती. इतिहास संशोधक व संग्राहक कै. बाळासाहेब पाटील यांनी शालिवाहन शक वर्षारंभ दिनी समारोह साजरा करण्याची परंपरा चालू ठेवली. त्यांच्यानंतर अनेक इतिहास अभ्यासक आणि नागरिकांनी शालिवाहन काळाचे स्मरण व चिंतन व्हावे या हेतूने ही परंपरा जोपासली आहे.

शालिवाहन काळाचे नव्या दृष्टिकोनातून आकलन गरजेचेतत्कालीन सातवाहन साम्राज्याखाली संपूर्ण दक्षिण भारतीय द्विपकल्प येत असे. सातवाहनाची वाहने हत्ती घोडे त्रिसमुद्राचे पाणी पीत असत असे म्हटल्या जात होते यातून त्यांच्या साम्राजाचे आकलन होते. यामुळेच ' त्रिसमुद्रतोय पितवावन ' अशी उपाधी शालिवाहन राजास दिली गेली होती. सातवाहनाच्या साम्राज्याचा पाऊल खुणा आजही त्याची राजधानी असलेल्या पैठण नगरीत अस्तित्वात आहेत.  या वैभवशाली इतिहासाचे नव्या दृष्टीकोनातून आकलन करण्याची आता गरज असल्याचे जाणवत आहे. यात सातवाहनकालीन लोकसाहित्य आज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून या साहित्याचे ऐतिहासिक आकलन करणे गरजेचे आहे. तसेच सातवाहनकालीन शिलालेखांचे संकलनकरून तत्कालीन समाज व संस्कृतीवर प्रकाश टाकावा लागणार आहे. सातवाहनकालिन बौध्द लेणी महाराष्ट्रभर असून या लेणीसमूहातून प्रकट होणाऱ्या कला, साहित्य व संस्कृतीचा अभ्यास अद्याप झालेले नाही. यातून सातवाहनकालीन लोकसंस्कृतीसह सामाजिक आर्थिक पैलूचे नव्याने आकलन होऊ शकते. असे इतिहासकारांचे मत आहे. शालीवाहन राजाने आपल्या नावाने शक सुरू केला. त्यामुळे शककर्ता शालिवाहन अशी उपाधी दिली जाते. शालिवाहनाच्या काळात भूगोल, खगोल, ज्योतिष पंचांग, गणित ई. विषय प्रगतीपथावर होते. त्याचप्रमाणे शिक्के, मणी, आभुषणे, भांडी, पैठणी वस्त्र, नाणी, स्थापत्यकला, साहित्य आदींची भरभराट झाली होती. शिवाय, वैदिक धर्म, बौध्दधर्म व जैनधर्म आदी गुण्यागोविंदाने नांदत असत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिक