शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीनंतरही व्यापाऱ्यांची करचुकवेगिरी सुरूच; औरंगाबाद येथे जीएसटी विभागाच्या तपासणीत झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 13:45 IST

राज्य जीएसटी विभागाच्या पथकाने १ व २ डिसेंबर रोजी मालवाहू ट्रकची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देराज्य जीएसटी विभागाच्या पथकाची कारवाई १३ लाखांचा कर, दंड वसूल 

औरंगाबाद : जीएसटी (गुडस् अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स) लागू झाल्यानंतर व्यापारात होणाऱ्या करचुकवेगिरीला लगाम बसेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, जीएसटीतकरभरणा कमी झाल्याने केंद्र सरकारने ई-वे-बिलाची अंमलबजावणी सुरू केली; पण तरीही करचोरीचे प्रकार थांबत नसल्याचे दिसत आहे. नुकतेच राज्य जीएसटी विभागाने ई-वे-बिल न भरता मालवाहतूक करणाऱ्या १३ ट्रक जप्त केल्या आहेत व त्यांच्याकडून कर व दंडापोटी १३ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. 

करचुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात राज्य जीएसटी विभागाच्या पथकाने १ व २ डिसेंबर रोजी मालवाहू ट्रकची तपासणी करण्यात आली. दौलताबाद टी पॉइंट येथे मालट्रकच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्येक मालट्रकमधील सामान व ई-वे-बिलाची तपासणी केली जात होती. राज्यांतर्गत १ लाखांपेक्षा जास्त व आंतरराज्य मालवाहतुकीसाठी ५० हजारांपेक्षा जास्त किमतीच्या मालवाहतुकीसाठी जीएसटींतर्गत ‘ई-वे-बिल’ तयार करणे अति आवश्यक आहे. त्याची एक प्रत मालवाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरकडे असणे गरजेचे आहे.

मात्र, जीएसटी न भरता अजूनही बाजारपेठेत माल विक्री होत असल्याचे निदर्शनात येत आहे. हे पुन्हा एकदा जीएसटी विभागाच्या कारवाईने सिद्ध झाले आहे.  अधिकाऱ्यांना ई-वे-बिल न दाखविणारे १३ माल ट्रक जप्त करण्यात आले. लगेच करचुकवेगिरी करणाऱ्यांनी दंडासह १३ लाख रुपयांची रक्कम जमा केली. तपासणी पथकात राज्यकर उपायुक्त संतोष श्रीवास्तव, सहायक आयुक्त धनंजय देशमुख, तुषार गावंडे, माधव कुंभारवाड, संदीप नलावडे व राज्यकर निरीक्षकांचा समावेश होता. 

दररोज करावी लागेल तपासणी जीएसटी लागू होऊनही दीड वर्षाचा कालावधी उलटला; पण अजूनही करचुकवेगिरीचे प्रकार घडत आहेत. करचुकवेगिरी रोखण्यासाठी राज्य जीएसटी विभागाला दररोज मालट्रक चालकांकडील ई-वे-बिल तपासणी करावी लागेल. महिना, दोन महिन्यांनी तपासणी करून करचुकवेगिरी थांबणार नाही, असे करसल्लागारांनी नमूद केले. 

आॅक्टोबरमध्ये पहिली कारवाई दसरा-दिवाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते. हे लक्षात घेऊन राज्य जीएसटी विभागाने जालाना मार्गावरील लाडगाव टोलनाका येथे दोन दिवस मालवाहतुकीची तपासणी केली होती. त्यात ‘ई-वे-बिल’ नियमाचे पालन न करणाऱ्या १५ मालट्रक मालकांवर कारवाई करण्यात आली होती. त्या सर्व मालट्रक जप्त करण्यात आल्या व सुमारे ६० लाख रुपयांची दंडासह कर वसुली करण्यात आली होती. 

टॅग्स :GSTजीएसटीTaxकरAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय