शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

‘इन्शुरन्स’साठी ट्रॅक्टर पुरला

By admin | Updated: November 30, 2015 23:30 IST

परंडा : तालुक्यातील वाकडी येथील ट्रॅक्टरच्या चोरी प्रकरणात फिर्यादीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभारला आहे़ ट्रॅक्टरची चोरी झाली नसून,

परंडा : तालुक्यातील वाकडी येथील ट्रॅक्टरच्या चोरी प्रकरणात फिर्यादीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभारला आहे़ ट्रॅक्टरची चोरी झाली नसून, इन्शुरन्स मिळविण्यासाठी फिर्यादीने स्वत:च्या शेतजमिनीतच ते ट्रॅक्टर पुरून टाकल्याचा उलगडा परंडा पोलिसांच्या सर्कतेमुळे झाला आहे़मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यातील वाकडी येथील बालाजी ज्ञानदेव बानगुडे- पाटील यांनी ५ नोव्हेंबर रोजी परंडा पोलीस ठाणे गाठून सहा लाखाचे ट्रॅक्टर (क्ऱएम़एच़२५- ए़डी़०२४१) चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती़ तीन महिन्यांपूर्वी खरेदी केलेला ट्रॅक्टर काही कामे नसल्याने शेतवस्तीवर लावला होता़ मात्र, अज्ञातांनी तो लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले होते़ चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी सपोनि सुरेश सिरसट यांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात केली़ ट्रॅक्टर लावलेल्या घटनास्थळ परिसराची सोमवारी पाहणी करतेवेळी बाजूलाच एका ठिकाणी लावलेले अँगल, टाकलेल्या काटाड्या, काठ्या, लाकडं आणि जागेची रूंदी पाहता पोलिसांचा या खाली ट्रॅक्टर गाढल्याचा संशय बळावला़ पोलिसांनी तात्काळ जेसीबी मागवून घेत संबंधित ठिकाणावरील साहित्य काढून खोदकाम सुरू केले़ जेसीबीने खोदकाम करताच चोरीस गेलेला ट्रॅक्टर जमिनीत पुरल्याचे दिसून आले़ या घटनेने खळबळ उडाली असून, चर्चेलाही ऊत आला आहे़ वाकडी येथील बालाजी बानगुडे- पाटील यांनी ट्रॅक्टरवरील असलेल्या इन्शुअरन्सची रक्कम उचलण्यासाठी हा सर्व बनाव रचल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले़ या चोरी प्रकरणाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपासाधिकारी सपोनि सुरेश सिरसाट यांच्यासह पोना बी़पी़ वाहिल, एस़आऱचौधरी, पोशि़ एस़आऱक्षीरसागर आदीनीही मोठी कामगिरी बजावली़ (वार्ताहर)