शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

बीबी-का-मकबरा परिसरातील उत्खननात सापडलेला खजिना येणार पाहता

By संतोष हिरेमठ | Updated: March 19, 2024 13:04 IST

बीबी का मकबरा परिसरात उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू पर्यटक, इतिहासप्रेमींना न्याहाळता येणार

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध ‘दख्खनचा ताज’ म्हणजे बीबी का मकबरा परिसरात गेल्या महिनाभरात झालेल्या उत्खननात अनेक पुरातन वस्तू आणि रचना सापडल्या. पर्यटक आणि इतिहासप्रेमींमध्ये या सगळ्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन जमिनीखालील हा ऐतिहासिक खजिना पर्यटक, इतिहासप्रेमींसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बीबी का मकबरा परिसरात गेल्या महिनाभरापासून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद) डाॅ. शिवकुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरू आहे. ज्या ठिकाणी हे उत्खनन सुरू आहे, ती जागा काहीशी उंच आहे. गेली अनेक वर्षे त्यावर मातीचे ढिगारे टाकण्यात आलेले होते. उत्खननात हे मातीचे ढिगारे हटविण्यात आले आणि त्यानंतर एक - एक रचना समोर येत गेली. ही जागा पाहता येईल का, अशी विचारणा पर्यटक आणि इतिहासप्रेमींकडून होत आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने घेतला आहे. उत्खननाचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ते संवर्धनाचे काम झाल्यानंतर ही जागा पर्यटक, इतिहासप्रेमींना पाहता येणार आहे.

शेकडो छायाचित्रांत होणार कैदउत्खननाच्या जागेतील प्रत्येक भागाचे छायाचित्र काढण्यात येणार आहे. त्यातून ही जागा शेकडो छायाचित्रांमध्ये कैद होणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे सहायक अधीक्षण पुरातत्त्वविद डाॅ. प्रशांत सोनोने यांच्या देखरेखीखाली हे उत्खनन होत आहे.

परवानगी आवश्यकउत्खनन होणाऱ्या ठिकाणी पर्यटक भेट देऊ शकतील. परंतु, त्यासाठी उत्खनन करणाऱ्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद) डाॅ. शिवकुमार भगत यांनी सांगितले.

उत्खननाच्या ठिकाणी नेमके काय पाहता येईल?- मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, दगडी, चुन्याचे बांधकाम असलेल्या शौचालयाचा पाया.- पाणी निचरा करण्यासाठी केलेले बांधकाम. दगडाने झाकलेली नाली.- ‘मेहराब’युक्त (भिंतीतील एक कोनाडा, कपार) छोटी संरचना.- दगडाचा पाया, त्यावर विटांची भिंत.- मातीच्या ढिगाऱ्याने बंद असलेला एक दरवाजा.- एक कारंजे, कमानाकृती विटांची रचना.- चुन्यापासून तयार केलेली फरशी.

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabadऔरंगाबादBibi-ka-Maqbaraबीबी का मकबरा