शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

पर्यटक कर; प्रस्ताव अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:23 IST

अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद या तीन ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून ‘पर्यटक कर’ आकारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, सध्या यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्हा परिषद : अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद येथील दर निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद या तीन ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून ‘पर्यटक कर’ आकारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, सध्या यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत हा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.यासंदर्भात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वसंत सोळंके यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक येत असतात. दौलताबाद, वेरूळ आणि अजिंठा येथे दर्जेदार सुविधा निर्माण केल्यास पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होईल, त्याचप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातही मोठी वाढ होईल. या हेतूने पर्यटक कराची संकल्पना पुढे आली.जमा होणाºया पर्यटक कराच्या माध्यमातून पर्यटनस्थळी सुलभ शौचालये, पिण्याचे शुद्ध पाणी, पार्किंग, कचºयाचे व्यवस्थापन, रस्ते आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. मागील सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. सदरील पर्यटक कर हा व्यक्तीला आकारलेला कर असल्यामुळे त्यास शासनाची मंजुरी अनिवार्य आहे. नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव एक- दोन दिवसांत शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींमार्फत पर्यटन कर वसूल केला जाईल. हा कर संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रहिवासी, ५ वर्षांखालील पर्यटक मुले, जि.प. संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना लागू राहणार नाही. ग्रामपंचायतींनी वसूल केलेला कर हा जिल्हा परिषदेच्या ग्रामनिधीत जमा केला जाणार असून, प्राप्त करापैकी २५ टक्के रक्कम ही ग्रामपंचायतींना, तर उर्वरित ७५ टक्के रकमेतून पर्यटनस्थळी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी खर्च केला जाणार आहे.सरकारी अधिकाºयांनाही द्यावा लागेल करयासंदर्भात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके म्हणाले की, पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी गेलेल्या जि.प.व्यतिरिक्त अन्य सरकारी अधिकारी-कर्मचाºयांनाही पर्यटक कर द्यावा लागेल. प्रौढ पर्यटकांना ५ रुपये, तर ६ ते १२ वयोगटातील मुलांना ३ रुपये कर आकारला जाणार आहे. शैक्षणिक सहलीमध्ये येणाºया विद्यार्थ्यांना यामध्ये बºयापैकी सूट देण्यात आली असून, विद्यार्थ्यांकडून अवघा १ रुपया कर घेतला जाईल.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदtourismपर्यटनTaxकर