सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावापासून दोन कि. मी. अंतरावर असलेले ‘भारत दर्शन’ संग्रहालय पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. दिवसभरात हजारो पर्यटक येथे भेट देत आहेत. टाकाऊ वस्तंूपासून तयार करण्यात आलेल्या अनेक ऐतिहासिक स्मारकांच्या प्रतिकृती या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. विष्णू घुले यांनी हे संग्रहालय साकारले आहे. अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणारे पर्यटक याठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत.अजिंठा पोस्ट आॅफिसमध्ये पोस्टमास्तर म्हणून काम करणारे विष्णू घुले यांनी खराब झालेले बॉलपेन, रीफिल, स्केचपेन, कॅसेट, लग्नपत्रिका, शुभेच्छापत्र, विविध बाटल्यांचे झाकण, इंजेक्शन, सुया, बांगड्या, शो-बटन्स, अशा टाकाऊ वस्तूंपासून ऐतिहासिक स्मारकाच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. अजिंठा लेणी, वेरूळसारखी जागतिक पर्यटन स्थळे असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात विष्णू घुले यांनी स्वनिर्मित भारत दर्शन संग्रहालय साकारले आहे.
‘भारत दर्शन’ संग्रहालय बनले पर्यटकांचे आकर्षण
By admin | Updated: May 12, 2015 00:54 IST